अविश्वास ठराव : त्र्यंबकला बंदोबस्त

By admin | Published: June 21, 2017 12:39 AM2017-06-21T00:39:08+5:302017-06-21T00:39:26+5:30

अविश्वास ठराव : त्र्यंबकला बंदोबस्त

Confidence Resolution: Trilogy Settlement | अविश्वास ठराव : त्र्यंबकला बंदोबस्त

अविश्वास ठराव : त्र्यंबकला बंदोबस्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगरपालिका कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या विशेष सभेप्रसंगी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी त्र्यंबक पालिका परिसर व नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालिका सदस्यांच्या वाहनांनादेखील पोलीस बळ पुरविण्यात येणार आहे. हे पोलीस बळ रीतसर अधिकृत फी भरु न मिळविण्यात आले असल्याचे समजते.
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत शहराच्या प्रारु प विकास आराखड्यात हरीत पट्ट्यातील काही भूखंड पिवळे करुन त्यांचे नागरिकीकरण करण्याचा नगराध्यक्षांचा हेतू होता. विरोधी गटाला ते मान्य नसल्याने १३ नगरसेवक एकत्र आले. दि.१७ रोजी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. येत्या शुक्रवारी (दि.२३) अविश्वास ठरावावर निर्णय घेण्याकरिता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी सभेप्रसंगी वादावादी होऊ नये यासाठी पालिकेच्या मागणीवरुन व पोलीस दलातर्फे भक्कम पोलीस बंदोबस्त असेल. यामध्ये सभागृहात सदस्यांशिवाय नियमति कर्मचारी अधिकारी आदी वगळून अन्य कोणालाच प्रवेश राहणार नाही. पालिकेकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक एस ए सोनवणे यांनी दिली.

Web Title: Confidence Resolution: Trilogy Settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.