बाधितांना केले बंदिस्त; प्रतिबंधित क्षेत्र झाले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:35+5:302021-04-19T04:13:35+5:30

मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांच्याकडे या संदर्भात तक्रारी आल्यानंतर रविवारी (दि.१८) सकाळी डॉ. पटेल व त्यांच्या यंत्रणेने शिवाजीनगर ...

Confined to the victim; Restricted area became open | बाधितांना केले बंदिस्त; प्रतिबंधित क्षेत्र झाले खुले

बाधितांना केले बंदिस्त; प्रतिबंधित क्षेत्र झाले खुले

Next

मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांच्याकडे या संदर्भात तक्रारी आल्यानंतर रविवारी (दि.१८) सकाळी डॉ. पटेल व त्यांच्या यंत्रणेने शिवाजीनगर भागात तळ ठोकून रावण दहन मैदान परिसरातील नागरिकांना ध्वनिक्षेपकावरून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच तक्रारी प्राप्त नागरिकांच्या घरावर कर्मचाऱ्यांनी प्रवेश बंदचे बॅनर लावून संबंधित कुटुंबाला बंदिस्त केले.

कळवण शहरातील काही प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व वाटा मोकळ्या असल्याने नागरिकांचा बिनधास्त वावर असल्यामुळे जणू कोरोनाची धास्ती नाहीच अशा अविर्भावात बाधित रुग्ण गल्लीबोळात निवांत गप्पा मारत असल्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांना चिंता सतावत आहे.

कळवण शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातून परिसरातील नागरिक बिनधास्तपणे बाहेर पडताना दिसून येत आहेत. कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांना धोकादायक असल्यामुळे या परिसरातील मोकाट फिरणाऱ्या बाधित रुग्णांमुळे लहान मुलांच्या पालकांना चिंता सतावू लागली आहे.

कळवण शहरात शिवाजीनगर, संभाजीनगर, गणेशनगर, रामनगर, सुभाषपेठ, गांधी चौक, नेहरू चौक, ओतूर रोड, फुलाबाई चौक असे १० ते१२ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. पूर्वीच्या तुलनेत या क्षेत्राचा आकार एकदम लहान करण्यात आला. मात्र या भागातून अनेक व्यक्ती रात्री आणि दुपारच्या सुमारास बाहेर पडत असल्याचे दिसून येते. अनेक नागरिक प्रतिबंधित क्षेत्रातून वाहनाचा वापर करीत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार थांबण्याऐवजी वाढण्याचा धोका वाढला आहे.

कोट...

शिवाजीनगर भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांचा गल्लीबोळात बिनधास्त वावर असून ते वाहनाने फिरत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे केली. सकाळी मी स्वतः त्या भागात जाऊन नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या.नियमांचा भंग झाल्यास अशा नागरिकांवर कायदेशीर कारवाई करणार.

- डॉ सचिन पटेल

मुख्याधिकारी, कळवण नगरपंचायत

===Photopath===

180421\18nsk_31_18042021_13.jpg

===Caption===

कळवण येथे बाधितांच्या घरांना प्रतिबंधीत क्षेत्र केल्याचे दर्शविणारा फलक.

Web Title: Confined to the victim; Restricted area became open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.