चारा छावण्यांसाठी संस्थांची प्रशासनाकडून मनधरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:01 AM2019-05-05T00:01:22+5:302019-05-05T00:02:53+5:30
नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला असून, त्यावर शासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चारा छावण्यांवरून स्पष्ट झाली आहे. नाशिक जिल्ह्णात जनावरांच्या चारा छावण्यांची मागणी ग्रामीण भागातून होत असली तरी, छावणी सुरू करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत सापडले असून, त्यातूनच बाजार समित्या, खासगी संस्थांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.

शासनाने शेतकरी मागेल त्याठिकाणी जनावरांसाठी चार छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी लहान जनावरांसाठी ४५ रुपये व मोठ्या जनावरांसाठी ९० रुपये अनुदान जाहीर केले आहे. एका शेतकºयाचा फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश देण्यात यावा, तसेच छावणी चालकानेच चारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर शासनाकडे दहा लाख रुपये अनामत रक्कम भरणे सक्तीचे केले आहे. छावण्यांमधील यापूर्वी चारा घोटाळ्याचा अनुभव लक्षात घेता वेळोवेळी छावणीची विविध यंत्रणांमार्फत तपासणी केली जाणार आहे. बाजार समित्या, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, व्यक्तिगत व्यक्तीलाही छावणी सुरू करण्याची मुभा आहे, परंतु त्यासाठी उपरोक्त यंत्रणांचा अनुभवही लक्षात घेण्याची अट टाकण्यात आली आहे़
संपूर्ण एप्रिल महिन्यात चारा छावणीसाठी चालकाची प्रतीक्षा करण्यात आली, परंतु कोणी पुढे आले नाही. अखेर जिल्हा प्रशासनानेच प्रत्येक बाजार समित्यांना तसेच खरेदी-विक्री संघांना संपर्क साधून त्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी गळ घालण्यास सुरुवात केली आहे.
काही बाजार समित्यांनी त्यासाठी होकारही कळविला असला तरी, तसा प्रस्ताव मात्र सादर केलेला नाही. संस्थांच्या मते एका जनावराच्या मागे दिवसाकाठी मिळणारे ९० रुपयांचे अनुदान कमी असून, ग्रामीण भागात छावणीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी व कोठून करणार, असा प्रश्न आहे. शिवाय नाशिक जिल्ह्णात तसेच लगतच्या कोणत्याही जिल्ह्णात चारा शिल्लक नाही, त्याची पर जिल्हा-राज्यांतून वाहतूक करणे खर्चिक बाब आहे. छावण्यांची वाढती मागणी
नाशिक जिल्ह्णातील नांदगाव, बागलाण, सिन्नर, येवला, मालेगाव आदी तालुक्यांमधून जनावरांसाठी चारा वा चारा छावण्यांची मागणी केली जात असून, जनावरांच्या चाºयाची कमतरता दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.