‘त्या’ मतदारांची होणार खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:36 AM2018-01-23T00:36:30+5:302018-01-23T00:37:22+5:30

नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदार यादीत नामसाधर्म्य असलेल्या सुमारे एक लाख १२ हजार मतदारांच्या दुबार नावांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत येत्या महिनाभरात दुबार नावे असलेल्या मतदारांना नोटिसा बजावून त्यांची खात्री करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. सोमवारी यासंदर्भात मंगरूळे यांच्या समक्ष मनसेच्या तक्रारीची सुनावणी करण्यात आली.

Confirmation of 'those' voters | ‘त्या’ मतदारांची होणार खात्री

‘त्या’ मतदारांची होणार खात्री

Next

नाशिक : नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदार यादीत नामसाधर्म्य असलेल्या सुमारे एक लाख १२ हजार मतदारांच्या दुबार नावांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत येत्या महिनाभरात दुबार नावे असलेल्या मतदारांना नोटिसा बजावून त्यांची खात्री करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. सोमवारी यासंदर्भात मंगरूळे यांच्या समक्ष मनसेच्या तक्रारीची सुनावणी करण्यात आली.  गेल्या आठवड्यात महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव प्रमोद पाटील व राहुल ढिकले यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नाशिक पूर्व विधानसभेच्या अंतिम मतदार यादीत एक लाख १२ हजार मतदारांची दुबार नावे घुसडविण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याच त्याच नावाच्या व्यक्तींची त्यांच्या पत्त्यावर जाऊन खात्री केली असता त्या पत्त्यावर सदरच्या व्यक्ती राहात नसताना मग त्यांची नावे मतदार यादीत कशी समाविष्ट करण्यात आली, असा सवाल करून मनसेने एकप्रकारे निवडणूक आयोगाचे अधिकारी व सत्ताधारी भाजपाच्या लोकप्रतिनिधींची हात मिळवणी झाल्याकडे अंगुलीनिर्देश केला होता. यासंदर्भात वर्षभरापूर्वी निवेदन देऊनही निवडणूक अधिकाºयांनी त्याची दखल घेतली नाही, असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, मनसेच्या तक्रारीची दखल घेत पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी मनसेला नोटीस बजावून तक्रारीसंदर्भात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने सोमवारी सकाळी प्रमोद पाटील व राहुल ढिकले यांनी डॉ. मंगरूळे यांच्याकडे जाऊन मतदार यादीतील ज्या मतदारांच्या नावांना आक्षेप आहेत त्यांची यादी सुपूर्द केली व दुबार नावे वगळण्याची विनंती केली. डॉ. मंगरूळे यांनी मनसेची बाजू ऐकून घेत, याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. 
सॉप्टवेअरची मदत 
आता निवडणूक आयोगाकडून दुबार नावे शोधण्यासाठी तयार केलेल्या सॉप्टवेअरच्या माध्यमातून दुबार नावे शोधली जाणार असून, ज्यांची नावे दुबार सापडतील त्यांना आयोगाकडूनच नोटीस बजावण्यात येणार आहे. शिवाय दुबार नावे असलेल्या मतदारांचे वय, पत्ते, लिंग, मतदार संघ याची माहितीही बीएलओंकडून खात्री करून घेण्यात येणार आहे. ज्या मतदारांची नावे दुबार असतील त्यांना नोटीस बजावून निवडणूक अधिकाºयांकडे समक्ष हजर केले जाईल व कोणत्याही एका मतदारसंघात नाव ठेवण्याबाबतचे लिहून घेण्यात येणार आहे.

Web Title: Confirmation of 'those' voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.