‘सांबरी’तून पशुहत्येविरोधात संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:26 AM2018-12-22T01:26:15+5:302018-12-22T01:26:28+5:30
जंगलात राहणारी, सांबर मारून खाणाऱ्या व त्याच्या कातडीचा वस्त्र म्हणून वापर करणाºया आदिवासी जमात़ सांबत तसेच पशुहत्येविरोधात या जमातीतीलच एकाने आपल्याच कुटुंबीयांशी केलेला संघर्ष ‘सांबरी’ या दोन अंकी नाटकाने प्रेक्षकांसमोर शुक्रवारी (दि़२१) उलगडला़ कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण मंडळ, प्रिंप्राळा यांनी हे नाटक सादर केले़
कामगार नाट्य स्पर्धा
नाशिक : जंगलात राहणारी, सांबर मारून खाणाऱ्या व त्याच्या कातडीचा वस्त्र म्हणून वापर करणाºया आदिवासी जमात़ सांबत तसेच पशुहत्येविरोधात या जमातीतीलच एकाने आपल्याच कुटुंबीयांशी केलेला संघर्ष ‘सांबरी’ या दोन अंकी नाटकाने प्रेक्षकांसमोर शुक्रवारी (दि़२१) उलगडला़ कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत कामगार कल्याण मंडळ, प्रिंप्राळा यांनी हे नाटक सादर केले़
रोजच्या धकाधकीच्या जीवनात विविध प्रसार माध्यमांच्या युगामध्ये कळत-नकळत विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पशुहत्या ही रोजच होत असते़ पशुहत्या थांबावी हा सांबरी नाटकाचा मूळ गाभा असून, अॅड़ शैलेश गोजमगुंडे यांनी हे दोन अंकी नाटक लिहिले आहे़ नाटकाचे दिग्दर्शन पराग चौधरी यांचे तर प्रकाशयोजना किशोर खोबरे, पार्श्वसंगीत चेतन सोनार, नेपथ्य पूनम थोरवे, रंगभूषा व वेशभूषा मयुर भंगाळे यांची, तर निर्मिती मिलिंद पाटील यांची होती़ या नाटकात मुकेश अहिरे, सचिन भावसार, युगंधरा ओहोळ, संकेत राऊत, दीपक कोळी, किशोर मराठे, दीपाली सोनार, पूनम थोरवे, गोरक्ष कोळी, रवींद्र चौधरी, उमेश गोसावी, मोनी बारेला, कमलेश भोळे, नितीन पाटील, मनोज देवराळे, वाल्मीक गिरासे, कुणाल खांडे, सागर सदावर्ते यांनी भूमिका केल्या़
आजचे नाटक : व्हईल ते दणक्यात