नववीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:21+5:302021-04-24T04:14:21+5:30
गेल्या वर्षभरात नववीच्या विद्यार्थ्यांना फक्त दीड महिन्यांच्या कालावधीसाठी शाळेत बोलावण्यात आले होते. या कालावधीत शिक्षकांना कोणत्याही पद्धतीची चाचणी घेणे ...
गेल्या वर्षभरात नववीच्या विद्यार्थ्यांना फक्त दीड महिन्यांच्या कालावधीसाठी शाळेत बोलावण्यात आले होते. या कालावधीत शिक्षकांना कोणत्याही पद्धतीची चाचणी घेणे शक्य झाले नाही. दरम्यान, मूल्यमापन करण्यासाठी शासनामार्फत विद्यार्थ्यांची वीस गुणांची चाचणी घेण्याची अट घातलेली आहे आणि विद्यार्थ्यांकडे चाचणीचे पेपर देऊन त्यांची चाचणी घेण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. परंतु कोरोना महामारीचा कालखंड असताना विद्यार्थ्यांशी संपर्क कमीत कमी यावा, या अपेक्षेने शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन चाचणीसाठी पेपर देऊन चाचणी घ्यायची आणि नंतर पेपरचे संकलन करून मग निकाल बनवणे शिक्षकांच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह होणार नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. सध्याच्या वाढत्या संसर्गाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, याबद्दल शासनाने ठळक अशा पद्धतीची उपायोजना किंवा निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.