प्रशासकीय गोंधळामुळे दुकानदारांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:08+5:302021-04-25T04:14:08+5:30
नाशिक : प्रशासकीय यंत्रणांतील गोंधळामुळे किराणा दुकानदार संभ्रमात पडले असून, दुकान नेमके कधी सुरु ठेवायचे आणि कधी बंद, याबाबत ...
नाशिक : प्रशासकीय यंत्रणांतील गोंधळामुळे किराणा दुकानदार संभ्रमात पडले असून, दुकान नेमके कधी सुरु ठेवायचे आणि कधी बंद, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने दुकानदारांमधून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाने सकाळी ७ ते ११ यावेळेत किराणा दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यापूर्वीच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी व रविवारी पूर्णपणे बंदचे आदेश दिले होते.
सध्या हे आदेश कायम असले तरी शहरातील दोन यंत्रणांच्या आदेशामुळे शनिवारी (दि. २४) शहरातील इंदिरा नगर, पंचवटी भागातील काही दुकाने सुरु करण्यात आली होती. मात्र, सिडको, पाथर्डी, अंबड आणि इतर भागांचा पदभार असलेल्या पोलीस उपायुक्तांनी दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली नाही. यामुळे दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामुळे काही भागातील दुकाने काही वेळ सुरु राहिल्यानंतर तीही बंद करण्यात आली. यामुळे दुकानदारांमधून संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाने योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोट===
प्रशासनाने आम्हाला स्पष्टपणे आदेश दिले तर आमचे पूर्णपणे प्रशासनाला सहकार्य राहील. पण गोंधळामुळे काही भागातील दुकाने सुरु होतात व नंतर बंद करावी लागतात तर काही भागातील व्यापाऱ्यांना दुकाने सुरुच करता येत नाहीत, अशी स्थिती आहे. शनिवारी सिडको भागातील दुकाने सुरु करता आली नाहीत. या संदर्भात सिडकोतील व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली आहे.
- शाम दशपुते, माजी अध्यक्ष, धान्य व्यापारी संघटना