लसीकरणावरून भगूरला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:18 AM2021-08-12T04:18:22+5:302021-08-12T04:18:22+5:30
शिवसेनेच्या नगरसेविकेच्या मुलांनी रांगेत उभे राहूनही त्यांना डावलून अन्य नागरिकांना लस देण्यात आल्याची बाब घडल्याने वादावादी होऊन काही काळ ...
शिवसेनेच्या नगरसेविकेच्या मुलांनी रांगेत उभे राहूनही त्यांना डावलून अन्य नागरिकांना लस देण्यात आल्याची बाब घडल्याने वादावादी होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी (दि.१०) भगूर शहरातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी आरोग्य विभागाकडून ८० डोस आले होते. लस घेण्यासाठी रांग लावलेल्या नागरिकांना टोकन देण्यात येईल असे सांगून रांगेत उभे करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र काही कामगारांनी दादागिरी करीत लस घेण्यासाठी गर्दी केली. त्याला आरोग्य कर्मचाऱ्यांनीही साथ दिली. त्यातून वादावादी झाली. या रांगेत शिवसेना नगरसेविका कविता यादव यांचे दोन्ही मुलेही उभी होती. त्यांनाही डावलण्यात आल्याने नगरसेविका पती कैलास तुकाराम यादव यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाला. त्यामुळे यादव यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यांच्या मुलांना लस देण्यात आली. असाच प्रकार नियमित घडत असून, नगरपालिकेने योग्य नियोजन करून गोंधळ थांबवावा, अशी मागणी भगूर मनसे शहराध्यक्ष कैलास भोर, अजय वाहणे, नरेंद्र गायकवाड, प्रदीप साळवे, योगेश पाटोळे, संतोष भालेराव यांनी केली आहे.