पोलिसांच्या बदलत्या भूमिकेमुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:12 PM2020-05-28T23:12:36+5:302020-05-29T00:11:12+5:30

बसस्थानक परिसरात पोलिसांनी बुधवारी दुपारी अचानक दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर व्यापाºयात घबराट पसरली. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महामार्गावरील दुकाने बंद केल्याची सारवासारव त्यांनी केली.

Confusion due to the changing role of the police | पोलिसांच्या बदलत्या भूमिकेमुळे संभ्रम

पोलिसांच्या बदलत्या भूमिकेमुळे संभ्रम

googlenewsNext
ठळक मुद्दे सिन्नर : दुकाने बंद करण्याच्या इशाऱ्याने दुकानदार घाबरले

सिन्नर : बसस्थानक परिसरात पोलिसांनी बुधवारी दुपारी अचानक दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर व्यापाºयात घबराट पसरली. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी याबाबत पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महामार्गावरील दुकाने बंद केल्याची सारवासारव त्यांनी केली.
दुकाने चालू ठेवण्यास आपली हरकत नसल्याचा खुलासाही पोलीस अधिकाऱ्यांनी केला. व्यापारी पेठेतील व्यवहार सुरळीत होत असतानाच, पोलिसांच्या लहरीपणाने व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. बुधवारी दुकानातील व्यवहार वेग घेत असतानाच, दुपारी १२ च्या दरम्यान पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी बसस्थानक व गावठा परिसरातील कृषिपूरक साहित्याचे दुकान, मोबाइल शॉप, सलून अशी अनेक दुकाने बंद करण्याचा धडाका लावला.
ही बातमी शहरात कळताच व्यापाºयांत संभ्रम निर्माण झाला. व्यापारी एकमेकांना फोनवर विचारणा करू लागले. ग्राहकही सैरभैर झाले. दरम्यान व्यापारी संघटनेचे मनोज भगत, राजेंद्र देशपांडे, नगरसेवक शैलेश नाईक, सोमनाथ वाघ, रोहित गुजराथी यांनी बसस्थानक परिसरात जाऊन व्यापाºयांच्या भेटी घेत दुकाने उघडण्यास सांगितले. नगर परिषद मुख्याधिकारी संजय केदार यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी दुकाने बंद करण्यास आपण सांगितले नसल्याचा खुलासा केला. पोलीस निरीक्षक पाटील यांना विचारल्यावर त्यांनी घुमजाव केले.
दरम्यान काही पीडित व्यापाºयांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे पोलिसांच्या लहरीपणाबाबत तक्रार केली. वाजे यांनी पाटील यांना कडक भाषेत जाब विचारला. कोणतेही कारण नसताना व्यापाºयांना त्रास दिल्यास सर्व व्यापारी बंद पाळून पोलीस ठाण्यात ठिय्या देतील, असा इशारा वाजे यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी घुमजाव केले.
नियम न पाळणाºया व्यापाºयांना नोटिसा द्या, मात्र लहर येईल तेव्हा पोलिसांनी दुकानदारांना अकारण छळल्यास सहन केले जाणार नाही. तर नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे.
- राजाभाऊ वाजे,
माजी आमदार

Web Title: Confusion due to the changing role of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.