शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 01:21 AM2020-08-22T01:21:05+5:302020-08-22T01:21:23+5:30

नाशिक : येथील प्रभाग क्रमांक २६ मध्ये नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आलेल्या महापौर सतीश कुलकर्णी यांच्या समोरच शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे व स्थानिक नागरिक तथा शिवसेना माजी विभाग प्रमुख सुधाकर जाधव यांच्यात शाब्दीक बाचाबाची व शिवीगाळ झाल्याने काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.

Confusion due to internal dispute within Shiv Sena | शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे गोंधळ

शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे गोंधळ

Next

नाशिक : येथील प्रभाग क्रमांक २६ मध्ये नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आलेल्या महापौर सतीश कुलकर्णी यांच्या समोरच शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे व स्थानिक नागरिक तथा शिवसेना माजी विभाग प्रमुख सुधाकर जाधव यांच्यात शाब्दीक बाचाबाची व शिवीगाळ झाल्याने काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. सदर प्रकार सुरू असल्याने महापौरांना त आपला दौरा अर्धवट सोडावा लागला.
शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. खुटवड नगर भागातील समस्या सोडवण्यासाठी येथिल नगरसेविका अलका आहेर यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना निमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी भागवत आरोटे यांनाही बोलवले होते. दौरा सुरू झाल्यानंतर आरोटे आणि साहेबराव जाधव आमने सामने आले. आणि वादाला सुरुवात झाली. 3 वर्षांपूर्वी मनपा निवडणूकीच्या वेळी इच्छुकांनी काढलेल्या आपल्या निधीतील रकमेच्या खर्चवरून हा वाद झाला, असे सांगण्यात आले. हा वाद वाढत गेला आणि अर्वाच्य शिविगाळ करण्यापर्यंत आणि पुढे झटापटीपर्यंत गेला अन्य नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली असली तरी महापौर सतीश कुलकर्णी यांना दौरा अर्धवट सोडावा लागला.
यावेळी नगरसेवक मधुकर जाधव, नगरसेविका अलका आहिरे, नगरसेविका हर्षदा गायकर, भाजप पदाधिकारी कैलास आहिरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यासंदर्भात नगरसेवक आरोटे व जाधव यांच्यावर परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

Web Title: Confusion due to internal dispute within Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.