जळगावच्या चोपडा येथील मतदान केंद्रांवर तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ

By संकेत शुक्ला | Published: July 1, 2024 10:37 AM2024-07-01T10:37:28+5:302024-07-01T10:39:09+5:30

चोपडा येथे प्रत्यक्षात 935 मतदान झालेले असताना मतमोजणी करताना 938 मतपत्रिका निघाल्याने उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास हरकत घेत मतपत्रिका जास्त कशा आल्या याबाबत विचारणा करीत मतमोजणी प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे.

Confusion due to more than three ballot papers in jalgaon chopda | जळगावच्या चोपडा येथील मतदान केंद्रांवर तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ

जळगावच्या चोपडा येथील मतदान केंद्रांवर तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ

नाशिक : विधान परिषद निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील एका मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानापैकी तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने गोंधळ उडाला आहे. 

चोपडा येथे प्रत्यक्षात 935 मतदान झालेले असताना मतमोजणी करताना 938 मतपत्रिका निघाल्याने उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास हरकत घेत मतपत्रिका जास्त कशा आल्या याबाबत विचारणा करीत मतमोजणी प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे संबंधित मतदान केंद्रावरील मतमोजणी स्थगित करण्यात आली असून तिचा निर्णय नंतर घेतला जाणार असल्याचे समजते. इतर केंद्रांवर मात्र मतमोजणी सुरळीत चालू आहे.

Web Title: Confusion due to more than three ballot papers in jalgaon chopda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.