विधी विद्याशाखेच्या परीक्षा अर्जांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:20 AM2019-02-23T01:20:53+5:302019-02-23T01:21:09+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विद्याशाखेच्या परीक्षेच्या अर्जप्रणालीत सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विधी विद्या शाखेच्या प्रथम वर्ष एलएलबी व बीएल एलएलबीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना त्यांनी निवडलेल्या विषयांचे पर्याय उपलब्ध होत नसून चक्क अंतिम वर्षाच्या विषयांचे पर्याय दिसत असल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडत आहे़ परीक्षा अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे.
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विधी विद्याशाखेच्या परीक्षेच्या अर्जप्रणालीत सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विधी विद्या शाखेच्या प्रथम वर्ष एलएलबी व बीएल एलएलबीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना त्यांनी निवडलेल्या विषयांचे पर्याय उपलब्ध होत नसून चक्क अंतिम वर्षाच्या विषयांचे पर्याय दिसत असल्याने विद्यार्थी बुचकळ्यात पडत आहे़ परीक्षा अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विधीशाखेच्या मागणील सत्रात विद्यार्थ्यांचे निकाल लांबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठ प्रशासनाविरोधात संताप वाढलेला असताना आता एलएलबी आणि बीएएलएलबी द्वितीय सत्राच्या परीक्षेसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज संगणकीयप्रणालीत विद्यार्थ्यांना वेगळेच विषयांचे पर्याय दिसत आहेत. नाशिक विभागातून सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना या अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांनी आपली समस्या सोडविण्यासाठी नाशिक उपकेंद्र समन्वयक प्रशांत टोपे यांच्याशी संपर्क साधून परीक्षा प्रणालीतील समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असले तरी महाविद्यालयीन स्थरावर कारवायाची कार्यवाही पूर्ण होण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता असल्याने परीक्षा अर्ज करण्याची प्रक्रियाही रखडली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
नाशिकमधून सुमारे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा अर्ज करताना अडचण येते आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या पीयूएन सपोर्ट साइटवर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती अद्ययावत केल्यानंतर विद्यार्थ्यांना अशी अडचण येणार नाही. त्यासाठी महाविद्यालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. - प्रशांत टोपे, समन्वयक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नाशिक