शिक्षक संघटनांच्या विसंवादामुळे शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण आदेशाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:44+5:302021-03-10T04:16:44+5:30

प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम करणारे शिक्षक गावागावात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती घेत असताना असा प्रकार घडावा हे विशेष, शिक्षक संघटनांच्या ...

Confusion of out-of-school student survey order due to disagreement of teacher unions | शिक्षक संघटनांच्या विसंवादामुळे शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण आदेशाचा गोंधळ

शिक्षक संघटनांच्या विसंवादामुळे शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण आदेशाचा गोंधळ

Next

प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम करणारे शिक्षक गावागावात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती घेत असताना असा प्रकार घडावा हे विशेष, शिक्षक संघटनांच्या काही निवडक चमको प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात बुधवारी (दि.३) शिक्षण उपसंचालकांची भेट घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली. यात प्रामुख्याने गेल्या काही वर्षापासून एकाच संघटनेतून फूट पडल्याने विभक्त झालेल्या दोन संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. यातील एका गटातील काही चमको प्रतिनिधींनी शिक्षण उपसंचालकांची भेट घेतल्यानंतर सर्वेक्षणास स्थगीती मिळाल्याचे जाहीर करून टाकले. प्रत्यक्षात उपसंचालकांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. हेच अश्वासन दुसऱ्या गटालाही दिले होते. त्यामुळे सुरू झालेल्या श्रेयवादातून दुसऱ्या गटाने असा काही आदेश आहे का? याविषयी विचारणा केली. या श्रेयवादात गुरुवारचा दिवस उलटत नाही, तोच शुक्रवारी (दि.५) दुपारच्या सुमारास सर्वेक्षण स्थगितीचे पत्र व्हायरल झाले. या पत्रावर ३ तारीख खोडून ५ करण्यात आल्याने संशय निर्माण झाला. दरम्यान, प्रत्यक्ष काम करणाऱ्या काही शिक्षकांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी सर्वेक्षाचे बरचसे काम होत आले आहे. अशा स्थितीत काम स्थगीत केले, तर पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करावी लागेल अशी त्यांची वास्तव समस्या मांडली. तसेच अशाप्रकारे अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्या करताना सर्वच शिक्षकांना विचारात घ्यावे, अशा सुचनाही मांडल्या. त्यामुळे या दोन प्रमुख संघटनांमधील शिक्षकांच्या प्रश्नांवर असलेला विसंवाद पुन्हा समोर आला. याविषयी आरोप- प्रत्यारोप सुरू असतानाच शिक्षण उपसंचालक नितिन उपासणी यांना सर्वेक्षण पूर्ववत सूरू राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट कारावे लागल्याने या प्रकारात संघटनांच्या विसंवादामुळेच शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण आदेशाचा पूरता गोंधळ उडाल्याचे दिसून आले.

Web Title: Confusion of out-of-school student survey order due to disagreement of teacher unions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.