दुकाने बंद करण्यावरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:39 PM2020-06-11T22:39:00+5:302020-06-12T00:25:06+5:30
नाशिक : अनलॉक अंतर्गत शहरातील बाजारपेठा आणि अन्य सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध आणखी शिथिल करून दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली. परंतु दुसरीकडे मात्र यंत्रणेतील प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नेहेमीप्रमाणे बाजारपेठांमध्ये शिरून सायंकाळी ५ वाजताच दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याने गोंधळ निर्माण झाला आहे
नाशिक : अनलॉक अंतर्गत शहरातील बाजारपेठा आणि अन्य सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध आणखी शिथिल करून दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली. परंतु दुसरीकडे मात्र यंत्रणेतील प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नेहेमीप्रमाणे बाजारपेठांमध्ये शिरून सायंकाळी ५ वाजताच दुकाने बंद करण्यास भाग पाडल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलीस आयुक्तांनी एकत्र बसून आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घोषित केला होता आणि यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाºयांनी पहिल्या च दिवशी हरताळ फासला.
गेल्या आठवड्यात महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना यासंदर्भात व्यापारी संघटनांची बैठक घेतली आणि दुकाने सुरू करण्यास सवलत दिली. केवळ बाजारपेठेतील दुकाने आणि तिही केवळ ५ वाजेपर्यंत खुली करण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर दुकानदारांना सम आणि विषम तारखेस दुकाने खुली करण्याची अट घालण्यात आली. बुधवारी (दि.१०) प्रशासनातील अधिकाºयांनी एकत्रित बैठक घेऊन गर्दी टाळण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री ९ वाजेपर्यंत वाढविली. गुरुवारी (दि.११) अंमलबजावणी सुरू होत असतानाच दुपारी साडेतीन वाजेनंतर महापालिका आणि पोलीस यंत्रणेच्या कर्मचाºयांनी व्हॅन आणि अन्य वाहनांतून ध्वनी क्षेपकाच्या माध्यमातून दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यंत्रणेपुढे काहीच चालत नसल्याने अखेर दुकानदारांनी दुकाने बंद केली, त्यातून यंत्रणेचा गोंधळ स्पष्ट झाला.
----------------------
व्यावसायिकांत नाराजी
प्रशासनाने सम आणि विषम तारखांनाच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली. या नियमातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, अनेक भागांत महापालिकेच्या कर्मचाºयांनी किराणा व्यवसाय तसेच दूध विक्रेत्यांच्या दुकानासमोर पी-वन आणि पी-टू रंगविले आणि काही ठिकाणी स्टिकर्स लावले आहेत. विशेष म्हणजे सम आणि विषमची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक व्यापारी संकुलांसमोरील बाजूला दुकानेच नाहीत, तेथेही हे स्टिकर्स लावण्यात आले आहेत.