इगतपुरीत होम कोरोटांईन कुटूंब गायब झाल्याने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 07:09 PM2020-03-20T19:09:47+5:302020-03-20T19:11:55+5:30
नाशिक- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आॅस्ट्रेलियातून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आलेल्या चौघा नागरीकांना निगराणी खाली ठेवण्यात आले होते. मात्र, तेथून चौघे जण अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. आज हा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाची देखील धावपळ उडाली. मात्र, पोलीसांच्या मदतीने पाथर्डी परीसरातून संबंधीतांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, संंबंधीताना कोणत्याही आजाराची लागण झाली नव्हती. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही असा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

कोरोनाबाबत शासकिय यंत्रणा अत्यंत काटेकोपणे काळजी घेत आहेत. केवळ विदेशातून येणाऱ्या नागरीकांची माहिती मिळाल्यानंतर देखील शासकिय आरोग्य यंत्रणेचे पथक संबंधीतांची माहिती घेऊन विचारपूस करतात आणि केवळ विदेशातून आले असतील आणि कोणत्याही प्रकाराचा आजार झाला नसेल तरी चौदा दिवस घरातच निगराणी परंतु अलग राहण्यास सांगितले जाते. वैद्यकिय पथक संबंधीतांकडे रोज भेट देऊन तपासणी करीत असते. इगतपुरी तालुक्यातील एका गावात राहणारे चौघे जण वर्षभर आॅस्ट्रेलीयाला राहात होते. तेथून ते ११ मार्च रोजी भारतात आणि त्यांनतर नाशिकमध्ये परतले.
११ ते १७ मार्च दरम्यान ते नाशिक शहरातच वास्तव्याला होते. त्यानंतर ते त्यांच्या मुळगावी परतल्यानंतर ही बाबत इगतपुरी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख मोहमद तुराबअली यांना कळाल्यानंतर त्यांनी १८ मार्च रोजी आरोग्य पथक त्यांच्या घरी गेले आणि त्यांना आरोग्य विभागाने निगराणीखाली ठेवले होते. त्यांना घराच्या बाहेर न जाण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही संबंधीतांचे एक घर नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथे जात येतअसल्याने ते निघून आल्याने त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला. त्यानुसार शीघ्र कृती दलाचे पथक रूग्ण वाहिका घेऊन त्या ठिकाणी गेले असता संबधीत नाशिकला निघून आले आणि मोबाईल देखील बंद केल्याचे आढळले. त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. आरोग्य विभागाने त्यानुसार नाशिकमधील घोटी आणि अंबड पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी धावपळ करून संबंधीताला त्याच्या फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले आणि शासकिय यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.