महपालिकेत अभियंत्याच्या बदलीचा मेाठा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:40+5:302021-06-02T04:12:40+5:30
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे तीन पाणी ...
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडे तीन पाणी पुरवठा विभागांचे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यभार होता, तर तीन विभागांचे कार्यकारी अभियंता म्हणून शिवाजी चव्हाणके काम बघत होते. तसेच ते यांत्रिकी विभागाचे, पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता म्हणून देखील काम करीत होते. विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता पदाचा प्रभारी कार्यभार त्यांच्याकडेच होता. कारण या विभागामार्फत स्मार्ट लायटिंगचे काम करण्यात आले आहे, तर दुसरीकडे परिवहन सेवा महापालिकेद्वारे सुरू करण्यात येत असल्याचे त्याचे प्रमुखपदही चव्हाणके यांच्याकडेच होते. पाणी पुरवठा विभागाचे यांत्रिकी विभागाचे काम चव्हाणके यांच्याकडे तर वितरण विभागाचे अधीक्षक अभियंतापद संदीप नलावडे यांच्याकडे आहे. आता पी. बी. चव्हाण निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडील तीन विभागांचा पाणी पुरवठा वितरण विभागाचे काम शिवाजी चव्हाणके यांच्याकडे देताना त्यांच्याकडील यांत्रिकी तसेच विद्युत विभागासह अन्य जबाबदाऱ्या उदय धर्माधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. वास्तविक शहर अभियंतापदासाठी धर्माधिकारी सेवाज्येष्ठ आहेत. मात्र, ते पद प्रभारी म्हणून संजय घुगे यांच्याकडे जैसे थे ठेवण्यात आले आहे आणि धर्माधिकारी यांना अन्य विभागात नियुक्त करून त्यांची समजूत काढल्याची चर्चा आहे.