फार्मसी प्रवेशाच्या गुणवत्ता यादीत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:23 AM2018-06-30T01:23:12+5:302018-06-30T01:23:31+5:30
विविध व्यावसायिक अभ्यासक्र मांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केल्यामुळे फार्मसीची अलॉटमेंट लिस्ट जाहीर करण्यात तंत्रशिक्षण संचालनालयाचा गोंधळ उडाला आहे.
नाशिक : विविध व्यावसायिक अभ्यासक्र मांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केल्यामुळे फार्मसीची अलॉटमेंट लिस्ट जाहीर करण्यात तंत्रशिक्षण संचालनालयाचा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे फार्मसी पदवी प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली असून, तांत्रिक चुकीमुळे संचालनालयाने संकेतस्थळावर यादी जाहीर करून मागे घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) आपल्या संकेतस्थळावर फार्मसी पदवी अभ्यासक्र माची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी (दि. २८) प्रसिद्ध केली होती; मात्र त्यातील तांत्रिक चुका लक्षात आल्यानंतर डीटीईने ही गुणवत्ता यादी काढून घेतली. त्यामुळे प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संकेतस्थळावरील टोल फ्र ी क्र मांकावर संपर्क करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. संकेतस्थळावर पुढील सूचना प्राप्त होइपर्यंत प्रवेशप्रक्रि या थांबविण्याची सूचना डीटीईने प्रसिद्ध केली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना आता सुधारित गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागत आहे. व्यावसायिक अभ्यासक्र माच्या प्रवेशासाठी मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची सक्ती केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाईलाजाने खुल्या गटातून अर्ज केला होता. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दि.२८ जूनपर्यंत अंतिम मुदत होती. त्या आधारे डीटीईने फार्मसीची पहिली गुणवत्ता यादी तयार केली होती; परंतु जातपडताळणी विषयीच्या झालेल्या घडामोडींमुळे प्रवेशप्रक्रियाही प्रभावित झाल्याने पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊनही मागे घेतल्याचा अंदाज प्राचार्यांनी व्यक्त केला आहे.