नाशिकमध्ये टीईटी परीक्षेत गोंधळ; उशिरा पोहोचलेल्या उमेदवारांना केंद्रावर प्रवेशासाठी मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 11:36 IST2021-11-21T11:36:08+5:302021-11-21T11:36:18+5:30
शहरातील अनेक ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी साठी उमेदवार उशीरा पोहोचल्यामुळे गोंधळ उडाला.

नाशिकमध्ये टीईटी परीक्षेत गोंधळ; उशिरा पोहोचलेल्या उमेदवारांना केंद्रावर प्रवेशासाठी मज्जाव
नाशिक- शहरातील अनेक ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी साठी उमेदवार उशीरा पोहोचल्यामुळे गोंधळ उडाला. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे त्यामुळे बससेवा ठप्प असल्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे अनेक उमेदवार परीक्षेला वेळेत पोहोचू शकले नाही. गंगापूर रोडवरील नवरचना स्कूल, भोसला कॉलेज, उन्नती विद्यालय तसेच अन्य काही ठिकाणी उशिरा पोहोचलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी मज्जाव करण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडले