मालेगाव येथे कॉँगे्रसचे धरणे
By admin | Published: October 27, 2015 10:23 PM2015-10-27T22:23:01+5:302015-10-27T22:23:57+5:30
मालेगाव येथे कॉँगे्रसचे धरणे
मालेगाव : येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर कॉँगे्रस पक्षातर्फे माजी आमदार रशिद शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. देशात दिवाळीचा सण तोंडावर आला असताना राज्यात महागाईने उच्चांक गाठला आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले असून, तूरडाळीचे भाव २२० रुपये किलोपेक्षा जास्त झाले आहे. यामुळे गरीब मध्यमवर्गीयांना जीवन जगणे कठीण झाले आहे.
ऐन दिवाळी सणात भाववाढ झाल्याने मध्यमवर्गीयांना हा सण साजरा करणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांसाठी स्वस्त धान्य दुकानातून माफक दरात डाळी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थळी लावलेल्या विविध प्रकारच्या डाळी, तेल आदि जीवनावश्यक साहित्य लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.
धरणे आंदोलनात महानगरपालिकेच्या स्थायी
समिती सभापती ताहेरा शेख, नगरसेवक फातमा हारुण, सफीया युसुफ, हमीदा ताजुद्दीन, शफीउद्दीन शेख, साबिर गोहर, जैनू पठाण, जमालुउद्दीन सय्यद, अब्दुल कय्युम खालीद आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)