सिग्नल असूनही द्वारका चौकात कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:15+5:302021-03-29T04:09:15+5:30
जयभवानी रोडला वाढली वाहनांची वर्दळ नाशिक : उपनगर ते आर्टिलरी सेंटर रोड यांना जोडणाऱ्या जयभवानी मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली ...
जयभवानी रोडला वाढली वाहनांची वर्दळ
नाशिक : उपनगर ते आर्टिलरी सेंटर रोड यांना जोडणाऱ्या जयभवानी मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहिवासी क्षेत्र विस्तारले असून, वाहनांचे शोरूम, अनेक दुकाने तसेच दोन पेट्रोलपंपदेखील आहे. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ वाढलेली दिसते. जवळचा मार्ग म्हणून अनेक लोक या मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ वाढली आहे.
जिल्हा रुग्णालय आवारात बेघर
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील आवारात असलेल्या निवारा शेडमध्ये लोक आश्रयाला असल्याचे दिसते. कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून गर्दी वाढली आहे. आदिवासी, ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवारा शेड असून, त्याचा लाभ त्यांना होत आहे. मात्र गर्दीमुळे अनेकदा तेथे त्यांना थांबून दिले जात नसल्याचीदेखील तक्रार आहे.
हातगाडीवरील विक्रेत्यांमुळे कोंडीत भर
नाशिक : शहरातील सर्वात मोठा रहदारीचा रस्ता म्हणून महात्मा गांधी रोड ओळखला जातो. रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली वाहने आणि सातत्याने वाहनांची असलेली वर्दळ यातच हातगाडी चालकांची भर पडली आहे. या गर्दीत ठिकठिकाणी हातगाडीवरील फळ विक्रेत्यांनी जागा व्यापली. या गाड्यांमुळे वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. या विक्रेत्यांना कुणी हटकले तर वादाचे प्रसंग उद्भवतात.
सॅनिटायझेनशन करण्याची सूचना
नाशिक : एस.टी. महामंडळाच्या चालक-वाहकांसाठी असलेल्या विश्रांतिगृहाचे सॅनिटायझेशन करण्याची सूचना राज्य परिवहन महामंडळाने केली आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. त्यादृष्टीने चालक-वाहकांचीदेखील काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. विश्रांतिगृहाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात असल्याने कोविडच्या निमित्ताने आता त्यांची स्वच्छता होणार आहे.