‘कोरोना फायटर्स’ना मानाचा मुजरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:19 PM2020-04-22T22:19:49+5:302020-04-23T00:14:13+5:30
नाशिक : सामान्य नागरिकांना घराबाहेरही पडण्याची धास्ती वाटत असलेल्या काळात थेट कोरोनाबाधितांच्या, संशयितांच्या जवळ जाऊन त्यांच्यावर उपचार करणाऱ्या, देखभाल करणाºया, तोंडात हात घालून नमुने घेणा-या ख-या वीरांचा अर्थात आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मानाचा मुजरा केला.
नाशिक : सामान्य नागरिकांना घराबाहेरही पडण्याची धास्ती वाटत असलेल्या काळात थेट कोरोनाबाधितांच्या, संशयितांच्या जवळ जाऊन त्यांच्यावर उपचार करणाऱ्या, देखभाल करणाºया, तोंडात हात घालून नमुने घेणा-या ख-या वीरांचा अर्थात आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मानाचा मुजरा केला. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या वतीने त्यांना सन्मानपत्र प्रदान करून या आरोग्य सेवाव्रतींच्या कार्याला सलाम केला.
नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, परिचारिका आणि कर्मचारी कोरोनाविरोधात एकदिलाने लढत आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता हे सेवाव्रती कार्यरत असल्याने त्यांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन त्यांना प्रोत्साहित केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. अनंत पवार आणि अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर दखल घेतल्याबद्दल डॉ. सैंदाणे यांनी त्यांचे आभार मानले.
-------
सर्व अधिकारी, कर्मचारी त्यांची जबाबदारी पार पाडत असल्यामुळेच नाशिकमधून रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचे प्रमाणदेखील वाढले असल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगदाळे यांनी समाधान व्यक्त केले. या सर्वांचे कार्य अनमोल असून, त्यांच्या समर्पित वृत्तीची कदर होत असल्याबाबत आनंद व्यक्त केला.