कारगिल दिनानिमित्त जवानांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:39 AM2020-07-27T00:39:42+5:302020-07-27T00:40:02+5:30

कालिका देवी मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि डी. एस.एफ., नाशिक यांच्या वतीने कारगिल विजय दिन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी होऊन भारतासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

Congratulations to the soldiers on the occasion of Kargil Day | कारगिल दिनानिमित्त जवानांचे कौतुक

कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्र मात सहभागी कारगिल युद्धातील भारताचे अधिकारी, सैनिक, कुटुंबीय आणि अन्य पदाधिकारी.

Next

नाशिक : कालिका देवी मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि डी. एस.एफ., नाशिक यांच्या वतीने कारगिल विजय दिन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी होऊन भारतासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कारार्थींमध्ये कारगिलच्या युद्धात लढताना वीरमरण आलेले नाशिकचे जवान एकनाथ खैरनार यांच्या पत्नी रेखा खैरनार, कारगिल युद्धात लढलेले आपले दोन्हीही पाय आणि एक हात गमावलेले मेजर दीपचंद, सुभेदार माणिक निकम, सुभेदार डी. डी. महाजन, शहीद निनाद मांडवगणे यांचे वडील अनिल मांडवगणे, फ्लाइंग आॅफिसर पी. एन. उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांना नाशिक विभागाचे क्र ीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील, क्र ीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे, नितीन हिंगमिरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सुभेदार माणिक निकम यांनी सांगितले की मला प्रत्यक्ष कारगिल युद्धात सहभागी होऊन आपल्या भारत देशासाठी काहीतरी करता आले याच्यासारखा मोठा आनंद कोणताच नाही, असे सांगितले.
यावेळी उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक, अण्णा पाटील यांनी आपल्या बोलण्यातून या सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले. उपस्थितांचे स्वागत अशोक दुधारे यांनी केले, तर या कारगिल युद्धात सहभागी झालेल्या सत्कारार्थींची माहिती अस्मिता दुधारे यांनी दिली आणि प्रास्ताविक आनंद खरे यांनी केले.
प्रत्यक्ष युद्धातील अनुभव कथन
यावेळी मेजर दीपचंद सुभेदार माणिक निकम आणि फ्लाइंग आॅफिसर पी. एन उपाध्याय यांनी आपले कारगिल युद्धातील प्रत्यक्ष अनुभव सांगितले. मेजर दीपचंद यांनी सांगितले की कारगिल आणि द्रास या भागात उणे ४० ते ४५ डिग्री तापमान असते. हे युद्ध लढत असताना काहींनी माझ्या डोळ्यासमोर आपले प्राण गमावले. मलाही माझे दोन्ही पाय आणि एक हात गमवावा लागला, असे सांगितले.

Web Title: Congratulations to the soldiers on the occasion of Kargil Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.