भगूरला अष्टभुजा मातेच्या दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:25 AM2018-10-17T00:25:58+5:302018-10-17T00:26:34+5:30
येथील भगूरपुत्र विनायक दामोदर सावरकर यांनी वयाच्या १४व्या वर्षी भगूरच्या स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा मातेसमोर देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी शपथ घेतली त्या स्वातंत्र्यलक्ष्मी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून, दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.
भगूर : येथील भगूरपुत्र विनायक दामोदर सावरकर यांनी वयाच्या १४व्या वर्षी भगूरच्या स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा मातेसमोर देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी शपथ घेतली त्या स्वातंत्र्यलक्ष्मी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून, दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. भगूर शहरातील खंडोबा मंदिरात सावरकरांची अष्टभुजा देवी विराजमान आहे. घटस्थापनेच्या दिवशी विधिवत पूजा करून घट मांडण्यात आले असून, दररोज सकाळ- संध्याकाळ नित्यनेमाने आरती केली जात आहे. अष्टमीच्या निमित्ताने अष्टभुजा देवीच्या चक्रपूजेसाठी नवीन उगवलेले धान्य जमा करून त्याचे चक्र भरले जाते. चक्र भरण्याअगोदर देवीचे आसन हलवून जिथे चक्र भरण्याची जागा असते तिथे पाट मांडून देवीची स्थापना करण्यात येते. नवमीला सकाळी देवीस पंचामृताने आंघोळ घातली जाते. दसराच्या दिवशी अष्टभुजा देवी व श्री खंडेराव महाराज यांच्या मूर्तींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून, श्री क्षैत्र तपोवन देवी (रेणुका माता) देवळाली कॅम्प येथे सीमोल्लंघनासाठी जाऊन भेट घेऊन पालखी माघारी फिरणार आहे. सावरकरांच्या घराण्याची कुलदेवता अष्टभुजा देवीचा नवरात्रोत्सव पारंपरिक रीतीरिवाजाने भक्तीभावाने साजरा केला जात आहे. या मंदिरात खैरे कुटुंब पुजारी असून, आता त्यांची सातवी पिढी पूजा करत आहे.
घटस्थापनेच्या दिवशी विधिवत पूजा
करून घट मांडण्यात आले असून, दररोज सकाळ- संध्याकाळ नित्यनेमाने आरती केली जात आहे. अष्टमीच्या निमित्ताने अष्टभुजा देवीच्या चक्रपूजेसाठी नवीन उगवलेले धान्य जमा करून त्याचे चक्र भरले जाते.