कार्यकारिणी स्थान देऊन काँग्रेसने केला अनेकांचा पत्ता कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:20 AM2021-08-28T04:20:00+5:302021-08-28T04:20:00+5:30

प्रदेशच्या कार्यकारिणी विस्तारामुळे लवकरच शहर व जिल्ह्यातही फेरबदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, नाशिक शहरासाठी कायमस्वरूपी अध्यक्ष नाही ...

Congress cut the address of many by giving executive position | कार्यकारिणी स्थान देऊन काँग्रेसने केला अनेकांचा पत्ता कट

कार्यकारिणी स्थान देऊन काँग्रेसने केला अनेकांचा पत्ता कट

Next

प्रदेशच्या कार्यकारिणी विस्तारामुळे लवकरच शहर व जिल्ह्यातही फेरबदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, नाशिक शहरासाठी कायमस्वरूपी अध्यक्ष नाही तर ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात असल्याने त्यांनाही बदलण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी इच्छुकांनी गेल्या काही दिवसांपासून फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी अनेक नावांची चर्चा केली जात असली तरी, प्रदेशने कार्यकारिणीचा विस्तार करताना जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीतील राजाराम पानगव्हाणे, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडोळ या तिघांना प्रदेशवर घेऊन जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या मार्गातील काटे दूर केल्याचे भावना व्यक्त केली जात आहे. तोच प्रकार शहराध्यक्षपदाबाबत असून, गेल्या प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी असलेले शरद आहेर यांच्याकडेच नाशिक शहराची प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ‘एक व्यक्ती एक पद’ या तत्त्वानुसार नाशिक शहरासाठी स्वतंत्र शहराध्यक्ष असावा, अशी मागणी केली जात होती. त्यासाठी हेमलता पाटील, राहुल दिवे यांची नावे चर्चेत होती. प्रदेशने मात्र या पाटील व दिवे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिले तर शरद आहेर यांना प्रदेशवरून डच्चू दिल्याने आहेर हेच शहराध्यक्षपदी राहतील, असे संकेत मानले जात आहे.

Web Title: Congress cut the address of many by giving executive position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.