इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:59 PM2021-07-13T16:59:12+5:302021-07-13T17:01:36+5:30
त्र्यंबकेश्वर : इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा आमदार हिरामण खोसकर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सायकल बैलगाडी मोर्चा निघुन तहसिलदार कार्यालयावर नेण्यात आला.

यावेळी तहसिलदार कार्यालयाजवळ घोषणा देउन शेकडो स्वाक्षरींचे निवेदन देत मोर्चा विसर्जित करण्यात आला. यावेळी संपतराव सकाळे म्हणाले, केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ करुन तेल, डाळी आदींसह अनेक वस्तुंची भाववाढ केली. सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यांना उपासमारीने ग्रासले आहे. तर स्वयंपाकाचा गॅस संपल्याने नाईलाजाने महिला चुलीवर स्वयंपाक करत आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव जगाला भिडलेमध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडले आहे. याबाबत केंद्र सरकार अजुन निर्णय घेत नाही. तर संपतराव सकाळे यांनी अनेक विषयांवर सोडुन असल्याची टिका केली. यावेळी मधुकरराव लांडे, शांताराम मुळाणे, विश्वनाथ तथा बाळासाहेब कदम, प्रशांत खोडे, दिनेश तथा राजाबाबु पाटील, जयराम मोंढे, रोहित सकाळे, अजित सकाळे, दिनकर मोरे, नबीयुन शेख, पांडुरंग काळे, अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.