मनपा स्थायी समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:30+5:302021-07-30T04:15:30+5:30

महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी, नगरसचिव श्याम बुरकुल यांच्या उपस्थितीत ऑनलाइन विशेष ...

Congress dominates the Municipal Standing Committee | मनपा स्थायी समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

मनपा स्थायी समितीवर काँग्रेसचे वर्चस्व

Next

महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी, नगरसचिव श्याम बुरकुल यांच्या उपस्थितीत ऑनलाइन विशेष महासभा पार पडली. महासभेत कॉंग्रेस, सेना, भाजप, महागठबंधन आघाडीच्या गटनेत्यांनी बंद पाकिटात नवीन सदस्यांची नावे महापौर ताहेरा शेख यांच्याकडे सादर केली. महासभेत महापौर शेख यांनी निवड केलेल्या सदस्यांची व निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागेवरील सदस्यांच्या नावांची सभागृहात घोषणा केली. यात स्थायी समिती सदस्यपदी कॉंग्रेसचे विठ्ठल बर्वे, रजियाबेगम अब्दूल मजीद, शेख रजियाबी शेख इस्माईल, फैमिदा मो. फारूख कुरैशी तर महागठबंधन आघाडीतर्फे शेख कलीम शेख दिलावर, सेनेतर्फे सखाराम घोडके, भाजपातर्फे दीपाली वारूळे, छाया शिंदे तर राजीनामा दिलेल्या सदस्यांच्या जागेवर कॉंग्रेसतर्फे अस्लम अन्सारी, महागठबंधन आघाडीचे नबी अहमद अहमदुल्ला, शेख नसरीन शेख अल्ताफ, अन्सारी अख्तरून्नीसा मो. सादिक, सेनेच्या जिजाबाई बच्छाव यांचा समावेश आहे. स्थायी समितीत कॉंग्रेसचे ६, महागठबंधन आघाडीचे ५, भाजप व सेनेचे प्रत्येकी २ व एमआयएमचा १ असे पक्षीय बलाबल आहे.

इन्फो

महिला बालकल्याण समिती सदस्य

महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी कॉंग्रेसच्या रजियाबेगम अब्दुल अजीज, हमीदाबी शेख जब्बार, शबाना शेख सलीम, महागठबंधन आघाडीच्या सय्यद शबाना सय्यद अकील, अन्सारी आशपा मो. राशीद, अन्सारी सबीया मो. मुज्जमिल तर सेनेच्या पुष्पा गंगावणे, भाजपाच्या सुवर्णा शेलार व एमआयएमच्या शेख रहिमाबी शेख इस्माईल यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सदस्यांचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्वागत केले.

फोटो फाईल नेम : २९ एमजेयुएल १४ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची नावे बंद पाकिटात महापौर ताहेरा शेख यांच्याकडे सादर करताना महागठबंधन आघाडीच्या गटनेत्या शान-ए-हिंद.

290721\29nsk_31_29072021_13.jpg

फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.

Web Title: Congress dominates the Municipal Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.