दूध संकलन केंद्रावरील दुधाच्या दर्जाबाबत काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 09:06 PM2019-06-16T21:06:06+5:302019-06-16T21:07:16+5:30
लासलगाव : दूध संकलन केंद्रावर दूधातील फॅट आणि एस.एन.एफ. इलेक्ट्रॉनिक मशीनवर तपासून त्यावर शेतकऱ्यांना दर दिला जाता,े जिल्ह्यातील अनेक दुग्ध संकलन केंद्रावरील अशी यंत्रे जाणून बुजुन खराब करु न सेट केली जातात, त्यामुळे दुधातील फॅट व एस एन एफ कमी लागते. परिणामी दुधास दर कमी मिळतो अशी सर्व केंद्रांवरील यंत्रे तपासून दोषी असल्यास त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे नासिक जिल्हा काँग्रेसचे वतीने करण्यात आली.

याबाबत निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन होळकर यांनी दिले. सदर प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिगंबर गीते, निफाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर शेलार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भैय्या देशमुख, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कुमावत यांनी दिले.
रासायनिक खतांना ज्या प्रमाणे अनुदान दिले जाते त्याप्रमाणे पशुखाद्याना देखील अनुदान देवून त्यांचे दर नियंत्रणात आणले पाहिजे तसेच दूध व त्यापासून तयार होणारे पदार्थ जास्तीत जास्त निर्यात करु न दुधास जास्त दर कसा मिळेल या दृष्टिने प्रयत्न झाले पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे.