पदवीधरसाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
By admin | Published: January 15, 2017 01:35 AM2017-01-15T01:35:09+5:302017-01-15T01:35:24+5:30
शरद अहेर यांचा दावा : औरंगाबाद राष्ट्रवादीला तर नाशिक कॉँग्रेसला
नाशिक : आगामी ३ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्याचा दावा कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी पत्रकार परिषदेत केला. येत्या १७ जानेवारीला कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी संयुक्तरीत्या डॉ. सुधीर तांबे यांचा अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१७ जानेवारीला सकाळी ११ वाजता नाशिकरोड येथील पाटीदार भवन येथून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रोहिदास पाटील, सुरूपसिंग नाईक, अमरिश पटेल, माणिकराव गावित, कॉँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार भाई जगताप, आमदार उल्हास पवार, आमदार निर्मला गावित, आमदार आसिफ शेख यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भरण्यात येणार आहे. पदवीधर निवडणुकीसाठी यापूर्वीच शिक्षक लोकशाही आघाडीने कॉँग्रेसला पाठिंबा दिला आहे. यावेळी माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हर्षल तांबे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील आव्हाड, गुलाम शेख, उमाकांत गवळी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)