मालेगावच्या महापौरपदी कॉँग्रेसच्या ताहेरा शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 02:23 PM2019-12-12T14:23:22+5:302019-12-12T14:23:30+5:30
मालेगाव : महापालिकेत काँग्रेस शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख यांची सर उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड झाली आहे.
मालेगाव : महापालिकेत काँग्रेस शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख यांची सर उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड झाली आहे. महापौर शेख व उपमहापौर आहेर यांना प्रत्येकी ५१ मते मिळाली तर महागठबंधन आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवार शान ए हिंद व उपमहापौरपदाची उमेदवार अमिनतुल्ला पीर मोहमद अन्सारी यांना पराभवाला सामोरे जावे लागले.गुरूवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एस. भुवनेश्वरी उपस्थित होत्या. त्यांना मनपा आयुक्त किशोर बोर्डे, नगरसचिव राजेश धसे यांनी सहाय्य केले. महापालिकेत पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेना व काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेसकडे २९ तर शिवसेनेकडे १३ सदस्य होते. भाजपाच्या ९ सदस्यांचेही बळ मिळाल्याने काँग्रेस - सेना - भाजपचे सभागृहातील संख्याबळ ५१ झाले होते. सभागृहात होणाऱ्या या लढतीकडे शहरवासियांचे लक्ष लागून होते. निवडणूक काळात महापालिका परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. महापालिकेसमोरील रस्ता लोखंडी जाळ्या लावून अडविण्यात आला होता.