कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात कॉंग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 08:58 PM2020-12-03T20:58:27+5:302020-12-04T01:05:41+5:30
मनमाड : केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयक कायद्यामुळे शेतकरीवर्ग संतप्त झाला असून, सर्वत्र विरोध करण्यात येत आहे. या विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी मनमाड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष अफजलभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून शासनाला निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने आणलेल्या या विधेयकाविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. देशातील शेतकरी या विधेयकामुळे उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देऊन विधेयकाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनमाड शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष अफजल शेख, नगरसेवक संजय निकम, नाजीम शेख, उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, फकीरा शिवदे, खुबी जयस्वाल, सिद्धार्थ संसारे, भीमराव जेजुरे, अफरोज शेख, फातिमा शहा, अन्सार शहा, अशोक सानप, विजय परदेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.