त्र्यंबकला काँग्रेसचा मेळावा
By admin | Published: August 28, 2016 10:52 PM2016-08-28T22:52:40+5:302016-08-28T22:54:33+5:30
सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचा सत्कार
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथील संत जनार्दनस्वामी आश्रमातील हॉलमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये ४/५ ग्रामपंचायती वगळता ४७ ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य, उपसरपंच व सरपंच यांचा सत्कार करण्यात आला. ‘मोदीमुक्त भारत’ हे अभियान देशभर राबविण्यात येणार असून, या अभियानाचा प्रारंभ त्र्यंबकेश्वर या शहरातून आजपासून करीत असल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले. देशात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. जवळपास २० मंत्री भ्रष्टाचाराने माखलेले आहेत. लोकांना खोटी आश्वासने व भूलथापा देऊन हा पक्ष सत्तेवर आला. जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, असा टोलाही त्यांनी मोदी टीमला लगावला.
कार्यक्रमाचे आयोजन त्र्यंबक तालुक्याच्या आमदार निर्मला गावित यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार निर्मला गावित होत्या. जि. प. सदस्य निर्मला गिते, पंचायत समिती सभापती मंगळूतात्या निंबोरे, उपसभापती शांताराम मुळाणे, सुनंदा भोये, योगीता मौले, पालिका सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ललित लोहगावकर, रवींद्र गमे, विष्णुपंत बेंडकोळी, कचरू पा. डुकरे, पांडुरंगमामा शिंदे, जिल्हा सरचिटणीस प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, देवीदास जाधव, भिवा राजू महाले, कैलास चव्हाण, दिलीप मुळाणे, पुरुषोत्तम लोहगावकर, दिनेश पाटील, सुमनताई टोपले, सीताबाई खरपडे, मंदाताई वाचाळ, योगेश चोथे, मोहन भांबरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपतराव सकाळे यांनी केले. यावेळी भाषणातून आमदार गावित, देवीदास जाधव, कचरू पाटील डुकरे, भिवा राजू, कैलास चव्हाण, पुरुषोत्तम लोहगावकर, विष्णुपंत बेंडकुळी, मंगळू निंभारे आदिंनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले. दरम्यान, राजेंद्र बदाडे, काकासाहेब बोडके, मोहन बोडके, कोंडाजी महाले आदिंचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)