कॉँग्रेसची छाननी समिती घोषित

By admin | Published: January 18, 2017 11:35 PM2017-01-18T23:35:25+5:302017-01-18T23:35:48+5:30

मनपा निवडणूक : २३ तारखेच्या आत उमेदवारांची शिफारस करणार

Congress scrutiny committee declared | कॉँग्रेसची छाननी समिती घोषित

कॉँग्रेसची छाननी समिती घोषित

Next

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुकांच्या अर्जातून छाननी करण्यासाठी छाननी समिती घोषित करण्यात आली असून, त्यात तीन प्रदेश तर तीन स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. येत्या २७ तारखेला प्रदेश कॉँग्रेसची बैठक होणार असून, त्यात उमेदवार निश्चिती होणार आहे.  महापालिकेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्षाची स्थिती चांगली नसली तरी असलेल्या कॉँग्रेसजनांमध्येही वाद-विवाद होत आहेत. निष्ठावानांच्या बैठकाही स्वतंत्र होत आहेत. अशा स्थितीत आता थेट मुलाखतींना प्रारंभ होणार असल्याने राजकारण तापणार आहे. प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी यासंदर्भात स्थानिक कॉँग्रेसला पत्र पाठविले आहे. या समितीत प्रमुख म्हणून आमदार भाई जगताप यांच्याकडे जबाबदारी असून, जिल्हा पालक म्हणून विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हा प्रभारी उल्हास पाटील तसेच सदस्यपदी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, शहराध्यक्ष शरद अहेर यांचा समितीत समावेश आहे. या छाननी समितीने बैठकांची प्रक्रिया पूर्ण करून २३ जानेवारीपर्यंत कामकाज करून शिफारशींची यादी २४ जानेवारीपर्यंत प्रदेशकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या २७ तारखेला राज्य निवड मंडळाची बैठक होणार असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे कॉँग्रेसमध्ये इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Congress scrutiny committee declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.