नामांतरावर काँग्रेस-सेनेची मिलीजुली कुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:20+5:302021-01-14T04:13:20+5:30
नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शंकराचार्य संकुल येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिवसेना सरकार डुप्लिकेट काम करीत आहे. ट्विट मध्ये ...
नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शंकराचार्य संकुल येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिवसेना सरकार डुप्लिकेट काम करीत आहे. ट्विट मध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करायचा आणि मंत्रिमंडळाचा अधिकार असूनदेखील या विषयावर निर्णय घ्यायचा नाही असा हा प्रकार आहे. त्यामुळे ही शिवसेना काँग्रेसची मिलीजुली कुस्ती आहे. हे सर्व ठरवून सुरू आहे. आम्ही नामांतर करू असे एकाने म्हणायचे, मग दुसऱ्याने काय बोलयाचे हे सर्व ठरवून सुरू आहे, असेही ते म्हणाले.
लैंंगिक शिक्षणाचे आरोप होत असले तरी मुंडे यांनी स्वत:च काही आरोपांबाबत त्यांच्या सोशल मीडियावर कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्याबाबत त्यांच्या पक्षाने दखल घेतली पाहिजे. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांचे महिलेचे एक म्हणणे आहे, तर मुंडे यांचे वेगळे म्हणणे असून, त्यांनी या प्रकरणी न्यायालयात स्थगिती मिळविली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आधी या प्रकरणाबाबत पोलिसांनी सत्य बाहेर आणले पाहिजे. त्यानंतर भाजप आपली भूमिका ठरवेल असेही फडणवीस म्हणाले. केंद्र शासनाच्या कृषी कायद्याबाबत बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली आहे. आता न्यायालयाने नियुक्त केलेली समितीच आंदोलक शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
इन्फो...
माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागूल हे भाजपातून शिवसेनेत दाखल झाले. त्यावर बोलताना फडणवीस यांनी ते आता पक्षातून गेले म्हणून मी वाईट बोलणार नाही. परंतु, अन्य पक्षातून अनेकजण भाजपात येणार आहे. शिवाय २०१४ मध्ये असे अनेक नेते नव्हते, शिवसेनाही विरोधात होती तरी नाशिकमधील विधानसभेच्या तीन जागा निवडून आल्याच ना, असा टोलाही त्यांनी लगावला. ज्यांना सत्ताच जवळची वाटते त्यांना काय बोलणार असा प्रश्न नाही.
इन्फो...
लसीबाबत प्रोटोकाॅल ठरलेला
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमेार ठेवून पश्चिम बंगालला जास्त राज्य लस पुरविल्या जात असल्याचा आरोप होत असून, त्याचे फडणवीस यांनी खंडन केले. लस एकदम मेाठ्या प्रमाणात उपलब्ध होणार नसल्याने राज्यांना लस कशा प्रकारे पुरवायची याचा प्रोटोकॉल ठरला आहे, असे सांगून फडणवीस यांनी देशात काहीही झाले की केंद्र सरकारवर टीका करायची अशी महाराष्ट्रात सवय आहे, हे राज्यातील सरकारच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.