पेट्रोलला जीएसटी लागू करण्यासाठी कॉँग्रेसने विरोध करू नये : भंडारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:12 AM2018-09-10T00:12:54+5:302018-09-10T00:18:43+5:30
कॉँग्रेसने विरोधीपक्ष म्हणून पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा, विरोधाची भूमिका घेऊ नये तरच त्यांच्या आंदोलनाला अर्थ राहील, अन्यथा केवळ एक देखावानाट्य म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचा कॉॅँग्रेस-राष्टÑवादीचा हा एक प्रयत्न ठरेल, असे मत भाजपाचे राष्टÑीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
नाशिक :कॉँग्रेसने विरोधीपक्ष म्हणून पेट्रोल-डिझेललाजीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा, विरोधाची भूमिका घेऊ नये तरच त्यांच्या आंदोलनाला अर्थ राहील, अन्यथा केवळ एक देखावानाट्य म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचा कॉॅँग्रेस-राष्टÑवादीचा हा एक प्रयत्न ठरेल, असे मत भाजपाचे राष्टÑीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.नाशिक शहरात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भंडारी रविवारी (दि.९) आले होते. यावेळी त्यांनी कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या ‘भारत बंद’ आंदोलनाबाबत आपले मत मांडले.
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाल्याने सर्वसामान्य जनता त्यामध्ये होरपळून निघत आहे. सरकारविरुद्ध जनतेचा रोष व्यक्त होत असताना विरोधीपक्षांनी सोमवारी (दि.१०) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कालिकामंदिर परिसरात एका कार्यक्रमासाठी आलेल्या भंडारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, कॉँग्रेसचे भारतातील काही मुख्यमंत्री पेट्रोलवर जीएसटी लागू करण्यास विरोध करतात आणि दुसरीकडे त्यांचा पक्ष पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन पुकारतात हा विरोधाभास जनतेची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप भंडारी यांनी यावेळी केला. जीएसटीकक्षेत पेट्रोल-डिझेल आणण्यास त्यांनी पाठिंबा दिल्यास इंधन दरवाढीचा प्रश्न तत्काळ निकाली निघेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरवाढ कमी करण्यासाठी ही अत्यंत गरजेची बाब असून, केवळ सरकारवर दरवाढीचे खापर फोडण्यापेक्षा विरोधीपक्ष म्हणून त्यांनीदेखील त्यांची जबाबदारी ओळखणे गरजेचे असल्याचे भंडारी म्हणाले.