महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:05 AM2021-07-13T04:05:15+5:302021-07-13T04:05:15+5:30
गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे व महिला वर्गाचे स्वयंपाकाचे ...
गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे व महिला वर्गाचे स्वयंपाकाचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसची कमालीची दरवाढ झाली आहे. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला आहे, तर घरगुती गॅसची किंमत ९०० रुपये झाली आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. या अन्यायकारक दरवाढीच्या निषेधार्थ येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चुलीवर स्वयंपाक करून केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात नगरसेवक विठ्ठल बर्वे, अस्लम अन्सारी, नईम पटेल, जब्बारभाई जाफर मेंबर, नगरसेविका शबाना सलीम, फमीदा फारुख कुरेशी, कमरुनिस्सा मो. रिजवान, नूरजहाँ मुस्तफा, हमिदा ताजुद्दीन, हमिदा तुराबली आदींसह शेकडो महिला, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
----------------------------------------------------------------
सिन्नरला सायकल मोर्चा
सिन्नर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा निषेध करण्यासाठी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सायकल मोर्चा काढून केंद्र शासनाच्या महागाई धोरणाचा निषेध नोंदवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या सांगळे कॉम्प्लेक्स येथील कार्यालयापासून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुकाध्यक्ष सांगळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सोशल डिस्टन्सिंग, मास्क या सर्व बाबींचा वापर करून हा मोर्चा आयोजित केला होता. पेट्रोल पंपावर सुमारे पाच हजार लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन या सह्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पाठविण्यात येणार असल्याची माहिती सांगळे यांनी दिली. मोर्चात दिनेश चोथवे, मुजाहीद खतीब, उदय जाधव, भावेश शिंदे, हेमंत क्षीरसागर, अ. जाकीर भाई शेख यांनी मनोगत व्यक्त केले. सायकल मोर्चात गोपीनाथ झगडे, दामू शेळके, रत्नमाला मोकळ, भाऊसाहेब शेळके, योगिता मोरे, ज्ञानेश्वर लोखंडे, भाऊसाहेब मोकळ, सागर जाधव, शब्बीर सय्यद, ज्ञानेश्वर पवार, बबलू मोमीन, रावसाहेब थोरात, सूरज राऊत यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो - १२ सिन्नर मोर्चा
केंद्र सरकारच्या धोरणामुळे वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ सिन्नर येथे काँग्रेसने काढलेला सायकल माेर्चा.
फोटो- १२ मालेगाव काँग्रेस
काँग्रेसच्या महिला आघाडीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
120721\12nsk_19_12072021_13.jpg~120721\12nsk_20_12072021_13.jpg
फोटो - १२ सिन्नर मोर्चा केंद्र सरकारच्या धोरणामुळे वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ सिन्नर येथे काँग्रेसने काढलेला सायकल माेर्चा. ~फोटो- १२ मालेगाव काँग्रेस काँग्रेसच्या महिला आघाडीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.