नाशकात काँग्रेस उद्धव सेनेला धक्का, हेमलता पाटील, माजी उपमहापौर रंजना बोराडे शिंदे सेनेत दाखल
By संजय पाठक | Updated: February 12, 2025 16:04 IST2025-02-12T16:03:47+5:302025-02-12T16:04:05+5:30
पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

नाशकात काँग्रेस उद्धव सेनेला धक्का, हेमलता पाटील, माजी उपमहापौर रंजना बोराडे शिंदे सेनेत दाखल
संजय पाठक
नाशिक : शिंदे सेनेमध्ये इनकमिंग सुरूच असून काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि प्रदेश प्रवक्ता डॉ हेमलता पाटील तसेच सध्या उद्धव सेनेत असलेल्या माजी उपमहापौर रंजना बोराडे यांनी काल रात्री दिल्ली येथे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला.
पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मंत्री प्रताप जाधव, पक्षाचे नेते नरेश म्हस्के, नीलमताई गोरे, नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते अजय बोरस्ते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उद्धव सेनेच्या युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य दीपक दातीर यांनीही शिंदे प्रवेश केला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेस पक्षाच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील इच्छुक होत्या मात्र पक्षाला अनुकूल वातावरण असताना सुद्धा ही जागा परस्पर उद्धव सेनेला सोडण्यात आल्याने त्या नाराज झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय अगोदरच जाहीर केल्या होत्या. अखेरीस त्यांनी शिंदे प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव सेनेच्या रंजना बोराडे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक दातीर यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.