कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांचा भाजपात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 06:20 PM2017-08-17T18:20:53+5:302017-08-17T18:24:55+5:30
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्य पक्षांतून भाजपात येणाºया राजकीय पदाधिकाºयांची गर्दी वाढली आहे. गुरुवारी (दि.१७) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्टÑवादी, कॉँग्रेस व शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाºयांनी भाजपात प्रवेश केला.
बोरीवली येथे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.१७) दुपारी या अधिवेशन काळात इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, कॉँग्रेसचे पदाधिकारी मधुकर लांडे, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे कोषाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांचे पती विनायक माळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य केरू खतेले, माजी पंचायत समिती सदस्य साबळे यांच्यासह दहा गावच्या सरपंचांनी भाजपात प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या रूपांजली माळेकर यांनी शिवसेना व कॉँग्रेसला मदत केली होती. नंतर मात्र सभापती निवडीच्या वेळी त्या भाजपा व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या गोटात होत्या. माजी आमदार शिवराम झोले यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करीत जिल्हा परिषद निवडणूक शिवसेनेकडून लढविली होती. आता त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून भाजपात प्रवेश केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य केरू खतेले यांनीही राष्टÑवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. या पदाधिकाºयांच्या भाजपातील प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेससह राष्टÑवादी कॉँग्रेससमोर भाजपाचे मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.