तालुक्यात काँग्रेसची पीछेहाट

By admin | Published: September 2, 2016 12:14 AM2016-09-02T00:14:54+5:302016-09-02T00:15:14+5:30

सटाण्यातील बैठकीत कार्यकर्त्यांची तक्रार : खांदेपालट होण्याची शक्यता

Congress's backtrack in taluka | तालुक्यात काँग्रेसची पीछेहाट

तालुक्यात काँग्रेसची पीछेहाट

Next

सटाणा : बागलाण तालुक्यात कॉँग्रेस पक्षाची झालेली पीछेहाट, कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ याचे थेट तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांच्यावरच खापर फोडले. निवडणुका जिंकायच्या असतील तर सक्षम नेतृत्व द्या अन्यथा भोपळादेखील फुटणार नाही, अशी कैफियत उपस्थित कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, पक्षनिरीक्षक डी. जी. पाटील यांच्याकडे मांडली. त्यामुळे लवकरच कॉँंग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या आठवड्यात नाशिक जिल्हा कॉँग्रेस कमेटीच्या बैठकीत पक्षातील बागलाणच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांच्याबाबत उघड नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबत पक्षाचे उत्तर महाराष्ट्रचे प्रभारी आमदार भाई जगताप यांनी गंभीर दखल घेत जिल्हाध्यक्ष व पक्षिनरीक्षकांनी स्थानिकांची मते जाणून घेऊन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, निरीक्षक डी. जी.पाटील यांनी बुधवारी सायंकाळी सटाण्यात तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याांची बैठक बोलावली होती. बागलाण पंचायत समीतीच्या सभागृहात आयोजित या बैठकीच्या प्रारंभीच शहराध्यक्ष किशोर कदम यांनी कांकरिया यांनाच ‘टार्गेट’ केले. तालुकाध्यक्ष ‘फिजिकली अनफिट’ असल्याची टीका करत पक्षाची झालेली वाताहत पाहता उचलबांगडी करण्यापेक्षा त्यांनी स्वत:च त्या पदाचा त्याग करावा असा सल्ला दिला. सटाणा पालिकेत पक्षाचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक मनोज सोनवणे यांनी देखील नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली. तालुकाध्यक्ष व्यक्तिगत कामासाठीच पदाचा उपयोग करत असल्याचा आरोप करत अशा स्वार्थीपणामुळे पक्षात संघटन राहिले नाही. त्यामुळे आपल्या पक्षाचे कोणी तिकीट घेईल की नाही अशी भीतीही सोनवणे यांनी व्यक्त केली. युवक कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सिराज मुल्ला यांनी तर थेट पक्षावरच नाराजी व्यक्त केली.
पक्षात आमच्या लोकांना मानसन्मान मिळत नाही अशी खंत व्यक्त करत थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमच्या अल्पसंख्यांक उमेदवाराचा विचार व्हावा अशी मागणी केली. जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंतबापू अहिरे यांनीही पक्ष संघटन म्हाताऱ्यांचे काम राहिले नाही, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत त्यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले. खांदेपालट करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील ,पंचायत समीती सदस्य परशुराम अहिरे ,रवींद्र पवार यांनीही नेतृत्व बदलाची मागणी केली.

Web Title: Congress's backtrack in taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.