करवाढीविरोधात कॉँग्रेसची गोल्फ क्लबवर स्वाक्षरी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:10 AM2017-08-21T00:10:05+5:302017-08-21T00:17:38+5:30
महापालिका स्थायी समितीने दि. १६ रोजी करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यात घरपट्टी, मालमत्ता कर १८ टक्के, पाणीपट्टी पाच वर्षांमध्ये दुप्पट म्हणजे सुमारे १२० टक्केदरवाढ करण्यात आलेली आहे. या करवाढीला विरोध करण्यासाठी कॉँग्रेसच्या वतीने गोल्फ क्लब येथे स्वाक्षरी मोहीम घेतली. असंख्य नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला
नाशिक : महापालिका स्थायी समितीने दि. १६ रोजी करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यात घरपट्टी, मालमत्ता कर १८ टक्के, पाणीपट्टी पाच वर्षांमध्ये दुप्पट म्हणजे सुमारे १२० टक्केदरवाढ करण्यात आलेली आहे. या करवाढीला विरोध करण्यासाठी कॉँग्रेसच्या वतीने गोल्फ क्लब येथे स्वाक्षरी मोहीम घेतली. असंख्य नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला. सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर मोहीम राबविण्यात आली. या करवाढीमुळे नाशिककरांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. स्मार्ट सिटी योजना आणि अमृत योजनेतील निधी मिळावा म्हणून ही करवाढ बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. वास्तविक यासाठीचा निधी नागरिकांच्या खिशातून वसूल केला जाणार आहे. अगोदर नोटबंदी, जीएसटीमुळे त्रस्त नागरिकांना आता करवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. सदर दरवाढ लागू करण्यापूर्वी प्रशासनाने घरपट्टी, पाणीपट्टीची थकबाकी आगोदर वसूल करावी तसेच पाणीगळती सुधारणा करावी, परंतु योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीने व निधी मिळावा या हेतुने प्रशासन व सत्ताधारी कर वाढवून शहरवासीयांच्या डोक्यावर कराचा बोजा वाढत आहे. सदर करवाढ कशाला, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसच्या वतीने करवाढ मागे घेण्याची मागणी केली.