कळवण उपसभापतिपदी काँग्रेसच्या पल्लवी देवरे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 06:31 PM2018-11-30T18:31:48+5:302018-11-30T18:32:23+5:30
पंचायत समिती उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस आघाडी एकसंध असल्याचे दिसून आल्याने उपसभापतिपदी कॉँग्रेसच्या नरूळ गणाच्या सदस्य पल्लवी अतुल देवरे यांची बिनविरोध निवड झाली.
कळवण : पंचायत समिती उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस आघाडी एकसंध असल्याचे दिसून आल्याने उपसभापतिपदी कॉँग्रेसच्या नरूळ गणाच्या सदस्य पल्लवी अतुल देवरे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदाच्या नामनिर्देशनपत्रावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोघा सदस्यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी करून आघाडीचा धर्म पाळला, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम यांनी काम पाहिले.
गेल्या फेब्रुवारी २०१७ मध्ये कळवण पंचायत समितीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होऊन त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारून एकहाती सत्ता काबीज केली. काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. १४ मार्च २०१७ रोजी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत सभापतिपदी आशा पवार, तर उपसभापतिपदी विजय शिरसाठ यांची निवड झाली होती. सभापती आशा पवार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर, तर उपसभापती विजय शिरसाठ यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात आली.
उपसभापतिपदी काँग्रेसच्या पल्लवी देवरे यांचे एकमेव नामनिर्देशन निर्धारित वेळेत प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलास चावडे यांना केली. पल्लवी देवरे यांच्या नामनिर्देशनपत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे केदा ठाकरे व मीनाक्षी चौरे यांची स्वाक्षरी आहे. उपसभापती निवडीप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, कॉँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते यशवंत गवळी, सभापती लालाजी जाधव, नगराध्यक्ष मयूर बहिरम, उपनगराध्यक्ष कौतिक पगार, राष्टÑवादी कॉँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे आदी उपस्थित होते.