पानी फाउंडेशन स्पर्धेत कोनांबे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 06:55 PM2018-08-12T18:55:16+5:302018-08-12T18:55:57+5:30

सिन्नर : पानी फाऊंडेशने आयोजित वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्याने बाजी मारली आहे. तालुक्यातील कोनांबे गावाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर वडझिरे आणि धोंडबार ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात या तीनही गावांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

Connabai first in the water foundation competition | पानी फाउंडेशन स्पर्धेत कोनांबे प्रथम

पानी फाउंडेशन स्पर्धेत कोनांबे प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्देनिकाल : वडझिरे व धोंडबार ठरले यशाचे मानकरी; पुरस्कार प्रदान.

सिन्नर : पानी फाऊंडेशने आयोजित वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्याने बाजी मारली आहे. तालुक्यातील कोनांबे गावाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर वडझिरे आणि धोंडबार ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात या तीनही गावांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
सिन्नर तालुक्यात पाणी फाऊंडेशनसोबत हजारो हातांनी श्रमदान केले. सर्वात उत्कृष्ट कामाचा नमुना म्हणून सिन्नर तालुक्यात कोनांबे, वडझिरे आणि धोंडबार या गावांनी वॉटरकप स्पर्धेत बाजी मारली.
विशेष म्हणजे पुरस्कारासाठी शासनाने मुख्यमंत्री निधीतून प्रथम, द्वितीय यांना प्रत्येकी ५ लाख रुपये व तृतीय क्रमांकाच्या गावासाठी ३ लाख रुपये अतिरिक्त निधी देण्याची घोषणा याप्रसंगी करण्यात आली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत अमीर खानच्या पाणी फाऊंडेशनकडून नाशिक जिल्'ात ठिकठिकाणी श्रमदान करण्यात आले होते. विशेष म्हणजे, अमीर खानची पत्नी किरण राव हिनेदेखील सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथे सहा हजार नागरिकांसोबत श्रमदान केले होते. पळणारे पाणी चालते, चालणारे पाणी थांबते करणे व थांबलेले पाणी जमिनीत मुरवणे, अशा जलप्रकल्पातून गावाचा विकास होतो, याचे महत्त्व कोनांबेकरांना पटले आणि अभिनेता आमिर खानच्या ‘पानी फाऊंडेशन’च्या सहकार्याने कोनांबेत साकारला बरड जमिनीवर महाश्रमदान करण्यात आले. ३ हजार श्रमदात्यांच्या ६ हजार हातांनी किमया करत अवघ्या तीन तासांत ११ लाख लिटर पाणी साठवणारे सलग समतल चर तयार करण्यात आले होते.

तर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या वडझिरे गावाने जलसंधारणाच्या माध्यमातून जलक्रांती केली असून पूर्वीचे दुष्काळी गाव ही ओळख पुसण्यात येथील ग्रामस्थांना यश आले. गेल्या तीन वर्षांत वडझिरेसह परिसरातील गावे जलयुक्त झाली आहेत. वडझिरे गावाचे एकूण १२८५ क्षेत्र आहे. पिण्यासाठी ३.५५५ कोटी लिटर पिण्याच्या पाण्याची गरज असते. तसेच जनावरांसाठी १ कोटी लिटर पाणी लागते. गावाला एकूण ३.५५५ कोटी लिटर पाण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, यावर्षीच्या कामाचा एकूण व्याप बघता दुप्पटीने पाणी साठवण क्षमता तसेच एकूण पाणी गावासाठी मिळाले आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्र मात येथील जनतेने सहभाग घेतला. गेल्या ४५ दिवसांपासून या गावात एकजुटीने रात्रंदिवस श्रमदान केले होते. गावकऱ्यांच्या या उपक्र माला नाशिक जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था, प्रशासकीय अधिकारी, त्यांची कार्यालये यांनी एकत्र येत हातभार लावला होता.
तृतीय क्र मांक मिळालेल्या धोंडबार हे गाव कोनांबे गावाच्या पुढेच असून पाणी फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाने याठिकाणी नाला बर्डींग, समतल चर खोदण्यात आले. या कामामुळे पाणी टंचाईवर मात करण्यात यश आले आहे. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, कोनांब्याचे सरपंच संजय डावरे, उपसरपंच रंजना भागवत, प्रकाश डावरे, ग्रामसेवक संदीप देवरे, वडझिरेचे उपसरपंच छाया नागरे, अलका बोडके, अर्जुन बोडके, जयराम गिते, गोरख ठोंबरे, ग्रामसेवक पांडुरंग सोळंके, धोंडबारचे सरपंच चंद्रभान साबळे, हरि खेताडे, भाऊराव जाधव, चांगुणा खेताडे, ग्रामसेवक हेमंत पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


 

Web Title: Connabai first in the water foundation competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.