नाशिक हवाईमार्गे सात शहरांना जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 01:22 AM2018-01-25T01:22:03+5:302018-01-25T01:22:43+5:30

 Connecting seven cities through Nashik Airport | नाशिक हवाईमार्गे सात शहरांना जोडणार

नाशिक हवाईमार्गे सात शहरांना जोडणार

Next

नाशिक : अनेक वर्षांपासून विमान-सेवेसाठी प्रतीक्षा करणाºया नाशिककरांसाठी केंद्र सरकारची उडान योजना भरून पावली आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता आणखी सहा ठिकाणी नाशिकहून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार दिल्ली आणि गोव्यासह सहा ठिकाणी नाशिक जोडले जाणार आहे. त्यासाठी विविध चार कंपन्यांनी बीड केले असून, लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.
केंद्र सरकारच्या उडान योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत असून, त्यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील विविध सेवांचे टप्पे निश्चित केले आहेत. त्याअंतर्गत नाशिकमधून सहा मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी उडानचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर नाशिककरांची प्रतीक्षा संपली आणि पॅसेंजर टर्मिनल बांधून बंद असलेल्या ओझर येथील विमानतळावरून विमानसेवेला मुहूर्त लागला. मुंबई विमानतळावरून स्लॉट मिळाल्याने जून- जुलैमध्ये रखडलेली ही सेवा अखेरीस २३ डिसेंबर रोजी सुरू झाली. नाशिकहून मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी ही सेवा सध्या सुरू असली तरी मुंबईपेक्षा पुण्याच्या सेवेला अधिक प्रतिसाद मिळत आहे. याच दरम्यान उडानच्या दुसºया टप्प्याची तयारी सुरू झाली होती. नाशिकमधून कोणत्या शहरांना जाण्यास आवडेल यासंदर्भातील अनेक सर्व्हे नाशिकच्याच उद्योजक आणि व्यावसायिकांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू होते. त्यानुसार ही सेवा सुरू होणार असून, नाशिककरांची इच्छा पूर्ण होणार आहे. केवळ प्रवासच नव्हे तर नाशिकमधील उद्योग व्यावसायाला बुस्ट मिळणार आहे.
उडानच्या पहिल्या टप्प्यात नाशिकची सेवा रखडल्याने दुसºया टप्प्यात नाशिकचा केंद्र सरकारने समावेश केला नव्हता. मात्र ही सेवा सुरू झाल्याचे नागरी उड्डान मंत्रालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ऐनवेळी नाशिकचा दुसरा टप्प्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे आता नाशिकच्या विकासाला गती मिळणार आहे. - हेमंत गोडसे, खासदार 
किफायतशीर दरात प्रवासाची संधी
नाशिकहून दिल्ली, गोवा, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, दिल्ली, हिडान (गाझियाबाद) तसेच हैदराबाद या सात ठिकाणी विमानसेवा निश्चित करण्यात आली आहे. या सेवेसाठी एअर इंडियाची एअर लाइन्स, स्पाईस जेट, इंडिगो, ट्रस्ट, जेट एअरवेज या पाच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या सर्व मार्गांवर काही प्रमाणात किफायतशीर दरात प्रवासाची संधी मिळणार आहे.

Web Title:  Connecting seven cities through Nashik Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.