नवी मुंबई दरोडा प्रकरणात नाशिकच्या सराफांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 04:41 AM2017-11-22T04:41:34+5:302017-11-22T04:42:08+5:30
नाशिक : नवी मुंबईतील बँक आॅफ बडोदा दरोडाप्रकरणी तपास पथकाने मालेगावमधील एका संशयितास ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी नाशिक शहरातील तीन सराफा व्यावसायिकांची चौकशी करण्यात आली.
नाशिक : नवी मुंबईतील बँक आॅफ बडोदा दरोडाप्रकरणी तपास पथकाने मालेगावमधील एका संशयितास ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी नाशिक शहरातील तीन सराफा व्यावसायिकांची चौकशी करण्यात आली. त्यासाठी तीन दिवसांपासून मुंबई पोलिसांचे एक पथक नाशिकमध्ये तळ ठोकून होते़
जमिनीखालून भुयार करून चोरट्यांनी बँक आॅफ बडोदातील २२५ पैकी ३० लॉकरमधील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या चोरीचा तपास करणा-या पथकाने चोरीचे सोने विकत घेणारा मालेगावमधील सराफ राजेंद्र वाघ यास अटक करून अर्धा किलो सोने जप्त केले आहे. तसेच चोरीतील काही सोने नाशिकच्या सराफांनी विकत घेतल्याचा संशय असून, शहरातील तीन सराफांची मंगळवारी या पथकाने चौकशी केल्याचे वृत्त आहे़