समर्थ विकास पॅनलचा सर्व नऊ जागांवर विजय
By admin | Published: March 14, 2016 11:20 PM2016-03-14T23:20:42+5:302016-03-15T00:22:25+5:30
समर्थ विकास पॅनलचा सर्व नऊ जागांवर विजय
दिंडोरी : तालुक्यातील राजारामनगर येथील कादवा सहकारी साखर कारखाना सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत युनियनचे ेअध्यक्ष सुनील कावळे, सरचिटणीस अशोक भालेराव, संस्थेचे अध्यक्ष सुभाष वडजे यांच्या नेतृत्वाखालील समर्थ विकास पॅनलने सर्व नऊ जागा जिंकल्या असून, युनियनचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे यांच्या नेतृत्वाखालील क्रांती पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी वाय. एल. कराटे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सर्वसाधारण गटातून बाळासाहेब पाटील, वामनराव कोतवाल, मधुकर शिरसाठ, सचिन जाधव, जगन्नाथ भुसाळ, अनिल शेळके, इतर मागासवर्ग गट- संपतराव जाधव, अनुसूचित जाती-जमाती गट- संतोष शेक्रे , भटक्या विमुक्त जाती गट- अरु ण शिंदे हे बहुमताने विजयी झाले. निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. सर्व विजयी नूतन संचालकांचे कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव, सर्व संचालक मंडळ, युनियनचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)