साल्हेर किल्ला विजयास ३४९ वर्षेपुर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:33 PM2020-01-07T17:33:26+5:302020-01-07T17:33:40+5:30
सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यातील शिवकालीन, ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या विजयास रविवारी ३४९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साल्हेर किल्ल्यावर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सटाणा : बागलाणच्या पश्चिम पट्यातील शिवकालीन, ऐतिहासिक साल्हेर किल्ल्याच्या विजयास रविवारी ३४९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साल्हेर किल्ल्यावर विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
साल्हेर किल्ल्याचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्यांचे वंशज सोनालीराजे पवार, सत्तरसिंग सूर्यवंशी, किरणराजे भोसले, विजय काकडे, राणी भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ल्याच्या पायथ्यापासून कालिका मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. नरवीर सूर्यराव काकडे यांच्या समाधीचे पूजन करण्यात येऊन शिवरु द्र यज्ञविधी व महापूजा पार पडली.
यावेळी संपूर्ण परिसर शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला होता तर भगव्या झेंड्यांनी शिवकालीन वातावरण निर्माण झाले होते. दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फेगेल्या पाच वर्षापासून साल्हेर विजय दिवस साजरा केला जातो.