पोलिसांची कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद : सिंधूताई सपकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:33 AM2018-03-25T00:33:59+5:302018-03-25T00:33:59+5:30
पोलीस हेदेखील गणवेशातील नागरिकच आहेत. आपले कर्तव्य बजावताना इतरांचे वृद्ध आई-वडील, बायका-मुले सुरक्षित रहावीत यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता रस्त्यावर उतरतात. त्यातल्या त्यात क्षणोक्षणी दिव्य प्रसंगांचा सामना करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाºयांच्या जबाबदारीला मी सलाम करते, असे प्रतिपादन अनाथांची माय असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.
सिडको : पोलीस हेदेखील गणवेशातील नागरिकच आहेत. आपले कर्तव्य बजावताना इतरांचे वृद्ध आई-वडील, बायका-मुले सुरक्षित रहावीत यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता रस्त्यावर उतरतात. त्यातल्या त्यात क्षणोक्षणी दिव्य प्रसंगांचा सामना करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाºयांच्या जबाबदारीला मी सलाम करते, असे प्रतिपादन अनाथांची माय असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले. नाशिक येथील कार्यक्रमासाठी जात असताना त्यांनी अचानक अंबड पोलीस ठाण्यास भेट दिली. यावेळी सपकाळ म्हणाल्या, पोलिसांविषयी समाजाने पूर्वग्रहदूषित आकस न बाळगता सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या पावला-पावलावर परीक्षा घेणाºया ब्रीद वाक्याचा धैर्यपूर्वक सामना करणाºया पोलिसांचा सर्वांनीच आदर करावा. एकीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळून पोलीस सेवेत कर्तव्य बचावणाºया महिला कर्मचाºयांच्या व्यथा स्त्री म्हणून आपण चांगल्याप्रकारे जाणून आहोत. समाज कसाही वागला तरी महिला पोलिसांनी आपले कर्तव्य बजवावे, तसेच सतत कणखर राहून आपले कार्य निष्ठेने पार पाडावे. मी अनाथांची माय असले तरी महिला पोलीस संपूर्ण समाजाच्या आई आहेत, असेही सिंधूताई सपकाळ यांनी सांगितले. स्वागत पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तर आभार उपनिरीक्षक पुष्पा निमसे यांनी मानले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी अहिरे, हरेश्वर घुगे, मिथुन म्हात्रे, विजय पवार, रुपाली देवरे, धनवंता राऊत आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
महिला पोलिसांशी संवाद
सिंधूताई सपकाळ यांनी कार्यक्रमानंतर पोलिसांशी संवाद साधला. तसेच महिला पोलिसांच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेताना पोलीस ठाण्यात कार्यरत अधिकारी, कर्मचारी व विशेष करून महिला पोलीस कर्मचाºयांवरील कामाचा ताणतणाव दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढविला.