समाजप्रबोधनातून सामाजिक बांधिलकीचा जपला अनोखा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:49 AM2017-08-30T00:49:32+5:302017-08-30T00:49:37+5:30
जुनी तांबट लेन येथील राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळातर्फे गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक भावना जपण्याच्या हेतूने गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळातर्फे ताम्र धातूपासून साकारलेल्या सुमारे सहा फुटी लक्ष्मी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
जुनी तांबट लेन येथील राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळातर्फे गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक भावना जपण्याच्या हेतूने गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळातर्फे ताम्र धातूपासून साकारलेल्या सुमारे सहा फुटी लक्ष्मी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना स्त्रीभ्रूण हत्या, अवयवदान चळवळ, होर्डिंगमुक्त नाशिक, शेतकरी आत्महत्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोदा प्रदूषण यांसारखे ज्वलंत विषय देखाव्यातून सादर करत समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे काम मंडळातर्फे करण्यात आले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत करणे, त्यांना संसारोपयोगी साहित्य पुरविणे, नेत्रतपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, गरजूंना ब्लँकेट वाटपासह कपडे, अन्नधान्य, भांडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप यांसह दोन वर्षांपूर्वी झालेल्या सिंहस्थात मंडळातर्फे आरोग्य सुविधाही पुरविण्यात आली होती. नाशिकमध्ये पावसाळ्यात पूरपरिस्थिती गंभीर झालेली असताना नदीकाठच्या नागरिकांना संसारोपयोगी वस्तंूचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, दिवाळीत आदिवासी पाड्यांवर जाऊन फराळाचे वाटप, वृध्दाश्रमात फळांचे वाटप यांसह विविध सामाजिक उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात येतात. मंडळातील कार्यकर्ते आपला वाढदिवस साजरा न करता या वाढदिवसासाठी लागणारा खर्च त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या मुलांसाठी बांधण्यात आलेल्या आश्रमात देण्यात येतो आणि या विद्यार्थ्यांसमवेत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला जातो.