कास्ट्राइब महासंघाची सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:13 AM2021-01-14T04:13:29+5:302021-01-14T04:13:29+5:30
मालेगाव कामगारांचे शहर ओळखले जाते. येथील कष्टकरी समूहाला शासनाने कामगार न्यायालय तातडीने मंजूर करावे, असा ठराव कास्ट्राइब कर्मचारी ...
मालेगाव कामगारांचे शहर ओळखले जाते. येथील कष्टकरी समूहाला शासनाने कामगार न्यायालय तातडीने मंजूर करावे, असा ठराव कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाच्या सहविचार सभेत करण्यात आला. त्यानंतर मालेगाव तालुका शहर कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना विभागीय अध्यक्ष नानासाहेब पटाईत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यात मालेगाव तालुका शहर कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष- योगेश पाथरे, उपाध्यक्ष- रोहन आहिरे, सीमा देवरे, सचिव- अंकुष वाल्हे, सहसचिव- नीलेश फडके, जीवन हिरे, कार्याध्यक्ष- खान शमीम खान, कोषाध्यक्ष- महेंद्र चव्हाण, शहर संघटक- हरीश ब्राह्मणकर यांची नियुक्ती करण्यात आली. विभागीय उपाध्यक्ष रमेश पवार, भास्कर शिंदे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे, मोहन यशवंत, केदार अहिरे, संगीता सोनवणे, राजेंद्र मोहिते आदींनी सहविचार सभेत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन घनश्याम अहिरे यांनी तर आभार अंकुश वाल्हे यांनी मानले.