मागणी विचारात घेऊन पाण्याचे आवर्तन पालकमंत्री : कालवा आढावा बैठकीत नियोजनावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 01:23 AM2020-12-12T01:23:59+5:302020-12-12T01:24:14+5:30

नाशिक : जिल्ह्यातील पाणी मागणीचा विचार करताना आगोदर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Considering the demand for water cycle Guardian Minister: Planning discussion in canal review meeting | मागणी विचारात घेऊन पाण्याचे आवर्तन पालकमंत्री : कालवा आढावा बैठकीत नियोजनावर चर्चा

मागणी विचारात घेऊन पाण्याचे आवर्तन पालकमंत्री : कालवा आढावा बैठकीत नियोजनावर चर्चा

Next

नाशिक : जिल्ह्यातील पाणी मागणीचा विचार करताना आगोदर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना केल्या. जिल्ह्यात यंदा मुबलक पाणी साठा असला तरी शेतकऱ्यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन पाणी आवर्तनांचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी पाणी नियोजनावर चर्चा केली. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उर्ध्व मध्यम प्रकल्पाचे मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता व लाभ क्षेत्र विकास प्राधिकारणाच्या प्रशासक अलका अहिरराव, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्यासह पाणी वाटप संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, ज्या कालव्यांच्या लाभ क्षेत्रात पाण्याच्या रोटेशनची तत्काळ आवश्यकता आहे, अशा ठिकाणी पहिले रोटेशन द्यायला हरकत नाही. ज्या ठिकाणी मागणी नाही अशा धरणांच्या लाभ क्षेत्रात पाण्याचे रोटेशन तूर्तास थांबवून त्याचा उन्हाळ्यासाठी विचार करण्यात यावा तसेच रब्बी व उन्हाळी हंगामात पाणी मिळेल याबाबत सूक्ष्म नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. लाभ क्षेत्राबाबत लोकप्रतिनिधी व पाणी वाटप संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांशी व शेतकऱ्यांशी चर्चा करूनच वेळोवेळी निर्णय घेण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत गंगापूर प्रकल्पातील डावा व उजवा कालवा, उर्ध्व गोदावरी प्रकल्पातील पालखेड, ओझरखेड प्रकल्प, चणकापूर प्रकल्पांतर्गत गिरणा कालवा, कडवा प्रकल्प यामधील उपलब्ध पाणी साठा व त्याच्या भविष्यातील नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी पाणी वाटप संस्थांचे प्रतिनिधी भाऊसाहेब ढिकले, रामदास आवारे, दत्तात्रय संगमनरे यांनी पाणी वाटपाबाबत असलेल्या समस्यांवर चर्चा केली.

Web Title: Considering the demand for water cycle Guardian Minister: Planning discussion in canal review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी