महाविद्यालये सुरू होणार असल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:58+5:302021-02-06T04:23:58+5:30

नाशिक : श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने त्र्यंबकेश्वरकडे वारकरी निघाल्याने शहरात वारकऱ्यांचे दर्शन घडू लागले आहे. संस्थानच्या प्रशासकीय समितीने ...

Consolation as colleges begin | महाविद्यालये सुरू होणार असल्याने दिलासा

महाविद्यालये सुरू होणार असल्याने दिलासा

Next

नाशिक : श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्ताने त्र्यंबकेश्वरकडे वारकरी निघाल्याने शहरात वारकऱ्यांचे दर्शन घडू लागले आहे. संस्थानच्या प्रशासकीय समितीने यंदाची यात्रा स्थगित केली असली तरी वारकऱ्यांमधील उत्साह कायम आहे. त्र्यंबकनगरीकडे निघालेले भाविक नााशिक मुक्कामी त्र्यंबकेश्वराला जात असल्याने शहारात टाळमृदुंगांचे स्वर कानी पडू लागले आहेत.

बॉटनिकल गार्डन चार लेझर शो सुरू

नाशिक : पांडवलेणी येथील बॉटनिकल गार्डनमधील लेझर शो पुन्हा एकदा सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या उद्यानाची दुरवस्था झाल्याचे समोर आले होते. शहरातील एक निवांत आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून बॉटनिकल गार्डनकडे पाहिले जाते. येथील गैरप्रकाराला आळा घालून उद्यान कुटुंबीयांसाठी अधिक सोयीचे करावे, अशी मागणी होत आहे.

बांबूपासून बहुउपयोगी वस्तूंचे प्रशिक्षण

नाशिक : महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ आणि मविप्र जनशिक्षण संस्थांन यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूररोडवरील आर्किस्टेक्चर महाविद्यालयात बांबूपासून वस्तू निर्मिती प्रशिक्षण सुरू झाले आहे. मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला आहे.

तपोवन रस्त्यावर वाढले सायकलिंग

नाशिक : नाशिक शहर हे आता सायकलिंगचे शहरदेखील म्हटले जाऊ लागले आहे. शहरात सायकलिस्टची मोठी चळवळ उभी राहिली असून, दररोज नाशिकमधून शेकडो सायकलस्वार शहर परिसरात सायकलिंग करीत आहेत. शारीरिक फिटनेससाठी शहरात सायकलिंगला अधिक महत्त्व दिले जात आहे.

शहरात द्राक्ष विक्रीसाठी दाखल

नाशिक : बेमोसमी पाऊस, तसेच कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे शहर परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष पिकाला धोका निर्माण झाला होता. काही शेतकऱ्यांना फटकाही बसला. बागेत त्यांना फवारणी करावी लागली. आता मात्र बाजारात मोठ्या संख्येने द्राक्ष दाखल होऊ लागली आहेत. द्राक्षांमध्ये गोडवा असल्याचेदेखील व्यापारी सांगतात.

सातपूरला बससे वाढविण्याची मागणी

नाशिक : शहरात सध्या केवळ ४२ बसेस सुरू असून, त्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा दिली जात आहे. याचा फायदा मात्र सर्वांनाच होऊ शकलेला नाही. शहरात पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. महामंडळाने अनेक मार्गावरील सेवा बंदच केली आहे. मनपाची बससेवा येईल तेव्हा येईल तोवर सातपूर परिसरात बसेस वाढवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Consolation as colleges begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.